व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Eknath shinde Shivsena : अकोल्यातील शिंदेसेनेत खळबळ; १६ जूनच्या सर्व नियुक्त्या एकनाथ...

Eknath shinde Shivsena : अकोल्यातील शिंदेसेनेत खळबळ; १६ जूनच्या सर्व नियुक्त्या एकनाथ शिंदेंकडून रद्द

Turmoil in Shinde Sena’s Akola Unit; Eknath Shinde Cancels All Appointments Made on June 16 : जिल्हा संपर्कप्रमुखांच्या नाराजीनंतर पक्षश्रेष्ठींचा निर्णय; नव्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह

Akola अकोला जिल्ह्यातील शिंदेसेनेच्या संघटनात्मक राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून, १६ जून रोजी जाहीर करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २२ जून रोजी रद्द केल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील पक्ष संघटनेत नव्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शिंदेसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी अकोला जिल्ह्यात अलीकडेच मोठ्या प्रमाणात नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी जिल्हा परिषद सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी आणि मंगेश काळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच महानगराध्यक्षपदी राजेश मिश्रा, तर जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी अश्विन नवले यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती.

Operation Tiger : दोन खासदारांनी भूमिका स्पष्ट केली, उर्वरित चार खासदारांबाबत वाढले गूढ !

मात्र, या नियुक्त्या करताना जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याची चर्चा पक्ष वर्तुळात रंगू लागली होती. संघटनात्मक प्रक्रियेला डावलून निर्णय घेतल्याची भावना काही पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर साळवी यांनी आपली भूमिका पक्ष नेतृत्वापुढे मांडल्याची माहिती समोर येत आहे.

राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, अकोला जिल्ह्याच्या संघटनात्मक पुनर्बांधणीसाठी राजन साळवी यांनी पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेत पक्षश्रेष्ठींशी संवाद सुरू केला होता. त्याच दरम्यान जिल्हाप्रमुख आणि महानगराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर झाल्याने अंतर्गत असंतोष वाढल्याचे सांगितले जाते. नियुक्त्यांनंतर पक्ष संघटनेत निर्माण झालेली नाराजी आणि वाढता असंतोष लक्षात घेऊन अखेर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी १६ जून रोजी जारी करण्यात आलेला नियुक्ती आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Prafulla gudadhe: जिथे खासदार, आमदार फुटतायत, तिथे नगरसेवकांकडून काय अपेक्षा करणार?; पराभवानंतर काँग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधेंची उद्विग्न प्रतिक्रिया

या घडामोडींमुळे अकोला जिल्ह्यातील शिंदेसेनेच्या संघटनात्मक समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील अंतर्गत मतभेद, गटबाजी आणि संघटनात्मक समन्वयाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आगामी काळात नव्या नियुक्त्या कोणाच्या गळ्यात पडतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!