व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Devendra Fadnavis : कॉक्रोच हे काँग्रेसचेच पिल्लू; पुन्हा फेक नॅरेटिव्ह फॅक्टरी

Devendra Fadnavis : कॉक्रोच हे काँग्रेसचेच पिल्लू; पुन्हा फेक नॅरेटिव्ह फॅक्टरी

Devendra Fadnavis alleges that the Cockroach Janata party is Congress’s own creation : पुण्यात देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला

Pune विरोधी पक्ष थेट मैदानात भाजपशी लढू शकत नसल्याने त्यांनी फेक नरेटिव्ह फॅक्टरी’ सुरू केली असून, आता आपली ही लढाई वैचारिक राहिली नसून फेक नरेटिव्हविरुद्ध झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विरोधकांची ही नवीन कार्यपद्धती समजून घेऊन त्यांना आक्रमकपणे उत्तर दिले पाहिजे, असा जोरदार हल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चढवला. पुण्यात आयोजित भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते. काँक्रोच जनता पार्टी हेसुद्धा काँग्रेसचेच पिल्लू असल्याला आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला.

आपल्या भाषणात विरोधकांचा बुरखा फाडताना फडणवीस म्हणाले, लोकसभेपूर्वी भारत जोडो’च्या नावाखाली १८० संस्थांचा कार्यक्रम चालवला गेला. यातील अनेक संस्थांमध्ये अर्बन नक्षल’ विचारसरणीच्या लोकांचा भरणा होता. या संस्थांना कोणतीही घटनात्मक जबाबदारी नसते, त्या निवडणुका लढवत नाहीत; मात्र रोज खोटे बोलायचे आणि भाजपविरोधात नरेटिव्ह तयार करायचा, हाच त्यांचा एकमेव धंदा आहे. हेच लोक आता कँक्रोच जनता पार्टीत सहभागी झाले आहेत. आपला अजेंडा रेटत आहेत. काँक्रोच ही काँग्रेस जिताव पार्टी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

जनता जेव्हा त्यांना विचारते की, काँग्रेसच्या ६० वर्षांत काय केले तर त्यांच्याकडे उत्तर नसते. मात्र मोदी सरकारच्या १२ वर्षांचा हिशोब ते मागतात. महायुती सरकारने गेल्या तीन वर्षांत तब्बल १ लाख ३० हजार नोकऱ्या दिल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.

Mahayuti Politics : ‘बाहेरच्या सरदारांसाठी खुर्च्या; निष्ठावंतांना मात्र प्रतीक्षा’; सदाभाऊंच्या खदखदीमागची अस्वस्थ कहाणी!

इतिहासाच्या मुद्द्यावर भाष्य करताना ते म्हणाले, “NCERT च्या जुन्या पुस्तकांमध्ये मोगलांचा इतिहास १३ पानांचा होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अवघ्या एका पानावर आटोपला होता. आमचा खरा इतिहास लपवला गेला. मोदी सरकार आल्यावर आम्ही शिवरायांचा इतिहास १७ पानांपर्यंत वाढवला आणि विरोधकांचा हा फेक नरेटिव्ह मोडून काढला.
जिल्हा परिषदेच्या शाळांवरून सुरू असलेल्या राजकारणावर फडणवीस यांनी कडाडून टीका केली.

राज्यातील ७० टक्के जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उत्तम आहे, तिथे प्रवेशासाठी रांगा लागतात. पण विरोधकांना उर्वरित ३० टक्के शाळाच दिसतात. जुन्या वर्गखोल्यांमध्ये जाऊन फोटो काढायचे आणि अपप्रचार करायचा, हीच यांची पद्धत आहे. चुका असतील तर आम्ही कारवाई करतो; पण विरोधकांचा हेतू सुधारणेचा नाही. आपला पाऊण भरलेला ग्लास जनतेला दाखवण्याऐवजी, तो फक्त रिकामा कसा आहे हेच दाखवण्याचे काम ही यंत्रणा करत आहे, असे ते म्हणाले.

Maharashtra SIR : महाराष्ट्रातील 2 कोटींहून अधिक, मतदारांची नावे ड्राफ्ट यादीतून गायब;

विरोधकांच्या पुढील रणनीतीचा पोलखोल करताना फडणवीस म्हणाले, राम मंदिराला विरोध करून पाहिला, पण जनतेने त्यांना घरी बसवले. त्यानंतर राम मंदिरात १८०० कोटींचा घोटाळा झाल्याचा बनाव रचला गेला. हिंदुत्वाला थेट विरोध करता येत नसल्याने, हिंदुत्वात दोष कसे आहेत हे दाखवण्याचा हा प्रयोग आहे. आता विरोधकांचे पुढील टार्गेट कुंभमेळा असून तिथे भ्रष्टाचाराचा आरोप करण्याचे कारस्थान रचले जात आहे.

वास्तवात कुंभमेळ्यासाठीचे सर्व निविदा ३० टक्क्यांपर्यंत बिलो गेले असून १००-१०० कोटी रुपयांची बचत झाली आहे. चार वेगवेगळ्या टप्प्यांवर तपासणी केली जात आहे. तरीही खोटे बोला आणि रेटून बोला, हाच विरोधकांचा अजेंडा आहे, असा सणसणीत टोलाही फडणवीस यांनी लगावला.

error: Content is protected !!