Devendra Fadnavis says Nagpur Airport will serve as the growth engine for the development of Central India : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘जीएमआर’ (GMR) कंपनीकडे अधिकृत हस्तांतरण
Nagpur दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर आणि अनेक कायदेशीर अडथळ्यांवर मात केल्यानंतर अखेर नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘जीएमआर’ (GMR) कंपनीकडे अधिकृतपणे हस्तांतरण करण्यात आले. या ऐतिहासिक हस्तांतरण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी उड्डायण मंत्री राममोहन नायडू, खासदार प्रफुल पटेल आणि नागपूरच्या महापौर नीता ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ विकासाचा संपूर्ण संघर्षमय प्रवास मांडला. ते म्हणाले की, आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे. देशात जेव्हा नवनवीन एअरपोर्ट बनत होते, तेव्हा नागपूरचे विमानतळही तितकेच मोठे आणि जागतिक दर्जाचे झाले पाहिजे, असे आमचे स्वप्न होते. नागपूर विमानतळ विकासाला आधीच खूप उशीर झाला असून आम्ही गेली तब्बल १८ वर्षे यासाठी लढा देत आहोत. २०१८ मध्ये या प्रकल्पाचे टेंडर काढण्यात आले आणि २०१९ मध्ये ‘जीएमआर’ कंपनी क्वालिफायर ठरली. मात्र, त्यानंतर ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न’ या म्हणीप्रमाणे या प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या. राज्यात सरकार बदलले, अनेक कोर्ट केसेस झाल्या. हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई झाली, पण शेवटी निकाल जीएमआरच्या बाजूनेच लागला.” हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मी स्वतः वर्षभर सातत्याने प्रयत्न करत होतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डायण मंत्रालयाचे विशेष आभार मानले.
Sharad pawar : ‘आमचा एकही आमदार कुठे जाणार नाही’; बंडखोरीच्या चर्चांवर शरद पवारांचे स्पष्ट उत्तर
यावेळी मुख्यमंत्र्यांनी जीएमआर कंपनीने दुसऱ्या टर्मिनल्स आणि दुसऱ्या धावपट्टीसाठी (रनवे) तयार केलेल्या २०३० च्या आराखड्यावर थेट आक्षेप घेतला. कंपनीला स्पष्ट शब्दांत सुनावताना ते म्हणाले, “जीएमआरने सादरीकरणात दुसरा टप्पा २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे लिहिले आहे, पण हे आम्हाला अजिबात चालणार नाही. आमचे राजकीय जीवन पाच वर्षांचे असते. त्यामुळे हा प्रकल्प आमच्या याच राजकीय कारकीर्दीत पूर्ण झाला पाहिजे, अशी आमची आग्रही इच्छा आहे. सादरीकरणाच्या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे जागतिक दर्जाचे विमानतळ दाखवले आहे, त्याच धर्तीवर पुढील एका वर्षात याचे परिवर्तन झाले पाहिजे. तसेच विमानतळ पूर्णपणे तयार होण्यापूर्वी तिथली सपोर्टिंग व्यवस्था आधी सज्ज केली गेली पाहिजे.
Nitin gadkari: आधीच 18 वर्ष उशीर झाला, आता नागपूर विमानतळाच्या फाईल्स ८ दिवसांत मंजूर करा, नाहीतर…
नागपूर विमानतळाच्या भविष्यातील महत्त्वावर प्रकाश टाकताना मुख्यमंत्री म्हणाले की, “हे केवळ एक विमानतळ नसून नागपूर आणि संपूर्ण सेंट्रल इंडियाच्या (मध्य भारत) आर्थिक विकासाचे मुख्य ‘ग्रोथ इंजिन’ ठरणार आहे. पॅसेंजर आणि कार्गो हबसाठी येथे दोन रनवे असणे अत्यंत आवश्यक होते आणि याच दुसऱ्या रनवेच्या नियोजनामुळे नागपूरमध्ये ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग’ क्षेत्रात आधीच मोठी गुंतवणूक आली आहे. याशिवाय, येथील एमआरओ (MRO) सुविधेमुळे दक्षिण-पूर्व आशियातील विमाने देखभालीसाठी नागपुरात येतील, ज्यामुळे एक मोठी आर्थिक इकोसिस्टिम तयार होऊन या भागाच्या आर्थिक उन्नतीचा रस्ता निर्माण होईल. आता सर्व अडथळे दूर झाले असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.








