Dhananjay Munde : दिल्लीतील भेटीनंतरही धनंजय मुंडेंचं मंत्रिपदाचं स्वप्न अधुरंच?

Valmik Karads comeback questioned after bail rejected : वाल्मिक कराड जामीन फेटाळल्यामुळे कमबॅकवर प्रश्नचिन्ह

Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात कमबॅक करणार असल्याच्या चर्चांना मागील काही दिवसांत वेग आला होता. माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेल्या रिक्त जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी मुंडेंनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. संसदेच्या दालनात अमित शाह आणि धनंजय मुंडे यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाल्याचं सांगितलं जात असून, या भेटीनंतर राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत तर्कवितर्क सुरू झाले होते.

माणिकराव कोकाटे यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. कोकाटे सध्या बिनखात्याचे मंत्री होते आणि त्यांच्या जागी नव्याने मंत्रिमंडळात संधी मिळण्याची अपेक्षा धनंजय मुंडे यांना वाटू लागली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी तातडीने दिल्ली गाठून अमित शाह यांची भेट घेतल्याने त्यांच्या मंत्रिपदाचा मार्ग मोकळा होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

Pragya Rajiv Satav : काँग्रेसला मोठा धक्का; आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांचा राजीनामा,

मात्र, याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला एक महत्त्वाचा निर्णय धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या स्वप्नावर पाणी फेरणारा ठरू शकतो. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी फेटाळला आहे. तीन दिवसांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार यांनी हा अर्ज नामंजूर करत, सदर प्रकरण जामीन देण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी सत्र न्यायालयानेही वाल्मिक कराड याचा हत्येत सहभाग असल्याचं नमूद करत जामीन नाकारला होता. उच्च न्यायालयानेही वाल्मिक कराड हाच या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचं अधोरेखित केल्याने या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध सर्वश्रुत असल्य म्हणत या निकालाचा थेट परिणाम मुंडेंच्या राजकीय भवितव्यावर होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर धनंजय मुंडे यांनी यापूर्वी प्रकृतीचे कारण पुढे करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्या वेळीही त्यांनी दिल्लीत येऊन अमित शाह यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना भेट मिळाली नव्हती. यावेळी मात्र शाहांनी भेट दिल्याने मुंडेंच्या कमबॅकच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Kokate hit wicket : कोकाटे ही ‘हिट विकेट’, स्वतःच खड्ड्यात उडी मारली; योग्य वेळी केस बाहेर आली !

तथापि, औरंगाबाद खंडपीठाचा ताजा निकाल पाहता, एकीकडे दिल्लीतील राजकीय हालचाली असल्या तरी दुसरीकडे न्यायालयीन निर्णयामुळे धनंजय मुंडे यांच्या संभाव्य मंत्रिपदावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे अमित शाह यांची भेट घेऊनही मुंडेंचं मंत्रिपदाचं स्वप्न सध्या तरी अधुरंच राहण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.