व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधान पुन्हा मंत्रिमंडळात परतणार? केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांनी...

Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधान पुन्हा मंत्रिमंडळात परतणार? केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांनी दिल्लीत राजकीय उष्णता वाढली!

Dharmendra Pradhan may join union cabinet again : पेपरफुटीच्या वादानंतर द्यावा लागला होता राजीनामा

New delhi नीट परीक्षा गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या तीव्र वादानंतर विद्यार्थ्यांच्या उग्र आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागलेले माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. चालू आठवड्यातच केंद्र सरकारकडून मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले जाण्याची दाट शक्यता असून, या विस्तारात धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा स्थान देऊन केंद्र सरकार एकप्रकारे त्यांना ‘राजकीय अभय’ देणार असल्याचे बोलले जात आहे.
मे आणि जुलै दरम्यान नीट परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थी संघटनांसह काँक्रोच जनता पार्टी आणि विरोधी पक्षांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी लावून धरली होती. शिक्षामंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ताठर भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती, तर दुसरीकडे संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला होता. अखेर वाढता राजकीय आणि सामाजिक दबाव पाहता केंद्र सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला होता आणि त्यानंतरच हे आंदोलन शांत झाले होते.

NTAs big decision : ६०० तज्ज्ञांची हकालपट्टी एनटीएचा मोठा निर्णय !

आता या फेरबदलात धर्मेंद्र प्रधान यांच्या पुनरागमनाची चर्चा असली, तरी त्यांना शिक्षण खाते दिले जाणार नाही असाही एक दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. त्यांनी यापूर्वी सांभाळलेली इतर महत्त्वाची खाती पाहता, नव्या विस्तारात त्यांच्यावर नेमकी कोणती जबाबदारी सोपवली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, दिल्लीत सुरू असलेल्या या फेरबदलांच्या हालचालींमध्ये मित्रपक्षांचीही ताकद दिसून येत आहे. अलिकडेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील ६ खासदार शिंदे गटात सामील झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वजन अधिक वाढले आहे. शिवसेनेच्या कोट्यातून यापूर्वीच प्रतापराव जाधव यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे, परंतु वाढलेल्या खासदारसंख्येच्या बळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी दोन खात्यांची थेट मागणी केल्याची चर्चा आहे.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरमधील शेतकऱ्यांच्या हक्काची दिल्लीपर्यंत गर्जना! कोळसा प्रकल्पग्रस्तांना ३० लाखांचा भाव; मुनगंटीवारांच्या मागणीवर फडणवीसांचा केंद्राकडे प्रस्ताव

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी नुकतीच नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्यावर संघटनात्मक दृष्टीने मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याने, त्याचा परिणामही या मंत्रिमंडळ फेरबदलावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, ज्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठा लढा दिला, त्याच धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट केल्यास विद्यार्थी संघटना, विरोधक आणि काँक्रोच जनता पार्टी पुन्हा आक्रमक होण्याची आणि रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याची पूर्ण शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!