stage a protest by hitting the image of Dhirendra Krishna Shastri with slippers : पोलीस ठाण्यात धडक, फौजदारी कारवाई करण्याची केली मागणी
Akola हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. ‘बागेश्वर बाबा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी चप्पला मारत ती पायदळी तुडवली.
या प्रकरणी संबंधितांवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शहरप्रमुख आशिष गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात धडक देत निवेदन सादर केले.
Rohit Pawar : रोहीत पवार यांचा बुलढाणा दौरा रद्द, मोर्चापूर्वी मंडप अन् खुर्च्या नेल्या काढून
महापुरुषांविषयी जातीय आणि विखारी वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. याशिवाय, संबंधित प्रवचनकारावर महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली. निषेध नोंदविताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला.








