Dr. Prakash Amte : डॉ. आमटेंनी मांडले आदिवासी भागातील वास्तव

Serious health problems in tribal areas : आरोग्याच्या समस्या गंभीर; शिक्षण आणि तंत्रज्ञानाची हवी जोड

Nagpur आदिवासी भागात आजही आरोग्याचे प्रश्न मोठया प्रमाणात आहेत. शिक्षण आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून आरोग्य विषयक समस्या सोडविणे शक्य आहे. परिषदेच्या माध्यमातून आरोग्य विषयक समस्यांवर उपचार व उपाय शोधनू काढणे महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एम्स’ येथे आयोजित परिषदेत ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर, राज्यसभेचे माजी सदस्य पद्मश्री डॉ. विकास महात्मे, राज्याचे निवडणूक आयुक्त व शासनाचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. दिनेश वाघमारे उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule : सर्व शासकीय जागांवरील अतिक्रमण काढा

दिवंगत बाबा आमटे यांच्या संकल्पनेला मुर्तरूप देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. आरोग्यसेवेच्या माध्यमातून आदिवासींचे जीवन सुकर करण्यासाठी प्रत्नशील राहणे गरजेचे आहे. लोकबिरादरीच्या माध्यमातून आदिवासींची आरोग्य सेवा केली जात आहे. याचा विकास व संवर्धन होण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन डॉ. आमटे यांनी यावेळी केले.

आदिवासी आरोग्य धोरण निश्चितीसाठी ‘ब्लॉसम’ प्रकल्प महत्वपूर्ण असल्याचे डॉ. कानिटकर म्हणाल्या. शिक्षण, संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून आदिवासींचे जीवनमान सुधारण्यासाठी काय करता येईल, या विषयावर परिषदेत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या परिषदेत झालेल्या चर्चांमधून आदिवासींच्या आरोग्याविषयी निश्चित धोरण तयार करणे शक्य होईल, असे डॉ. दिनेश वाघमारे म्हणाले. सूत्रसंचालन डॉ. दर्शन दक्षिणदास यांनी करत उपस्थितांचे आभार मानले.

Terrible reality of the education system : आठवीच्या विद्यार्थ्यांना येत नाही दुसऱ्या वर्गाचं गणीत!

त्या-त्या उपचार पध्दतीतले महत्त्वपूर्ण गुणधर्माचे संशोधन करून त्याचे एकत्रिकरण केल्यास त्यातून अनेक उपयुक्त औषधोपचार प्राप्त होऊ शकतात, असा विश्वास डॉ. मिलिंद निकुंभ यांनी व्यक्त आला. या परिषदेच्या आयोजनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी एमयूएचएसचे प्रादेशिक अध्यक्ष डॉ. संजीव चौधरी यांच्यावर होती.