Eknath Shinde : खामगावात भाजपला धक्का; हिंदुत्ववादी नेता शिवसेनेत

Setback for BJP in Khamgaon; Hindutvavadi leader joins Shivsena : ॲड. अमोल अंधारे यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

Akola/Khamgao आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी खामगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. प्रदीर्घ काळ संघ परिवारात सक्रिय राहिलेले आणि कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचे तरुण नेतृत्व ॲड. अमोल अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. अकोल्यातील भव्य जाहीर सभेत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून, यामुळे खामगाव परिसरात शिवसेनेचे (शिंदे गट) संघटनात्मक बळ वाढल्याचे मानले जात आहे.

ॲड. अमोल अंधारे यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश हा खामगावच्या राजकारणासाठी महत्त्वाचा आहे. त्यांनी विद्यार्थी दशेत ‘अभाविप’पासून कार्याला सुरुवात केली होती. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांसारख्या संघटनांमध्ये त्यांनी विदर्भ स्तरावर महत्त्वाची पदे भूषवली आहेत. हनुमान व्यायाम मंडळाचे सचिव आणि पत्रकारितेतील योगदानाबद्दल ‘जिल्हा गौरव’ पुरस्कार प्राप्त असल्याने त्यांचा खामगाव शहरात मोठा जनसंपर्क आहे.

Local Body Elections : नगरपरिषदेचा सत्तापेच सुटणार; १३ जानेवारीला उपाध्यक्ष निवडीचा मुहूर्त

पक्षप्रवेशावेळी ॲड. अंधारे यांनी खामगाव तालुक्यातील ‘घाटाखालील’ ५१०० हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रवेशासाठी एका भव्य सभेचे नियोजन करण्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, “मी लवकरच खामगावात येतो, तुम्ही कामाला लागा,” असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या आश्वासनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, आगामी काळात खामगावात मुख्यमंत्र्यांची मोठी सभा होण्याची शक्यता आहे.

हा पक्षप्रवेश केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाला आहे. ॲड. अंधारे यांच्या रूपाने शिवसेनेला एक सुशिक्षित आणि आक्रमक चेहरा मिळाला आहे.
निवडणुकीवर प्रभाव: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये हिंदुत्ववादी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी शिवसेनेला याचा फायदा होऊ शकतो.

Local Body Elections : नगराध्यक्ष आणि बहुमतातील ‘संघर्ष’ शहरांच्या विकासाला ठरणार मारक?

 

 

स्थानिक वर्चस्व: खामगाव मतदारसंघात सध्या भाजपचे वर्चस्व असले तरी, शिवसेनेच्या या वाढत्या विस्तारामुळे महायुतीमधील अंतर्गत राजकारण अधिक रंजक होण्याची चिन्हे आहेत.
या पक्षप्रवेशावेळी माजी आमदार संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर आणि तालुका प्रमुख राजू बघे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. ॲड. अंधारे यांच्या या निर्णयामुळे खामगावच्या राजकीय वर्तुळात आता ‘शिवसेनेचा’ प्रभाव किती वाढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.