Bjp-leaders-congratulated-girish-gandhi-vidarbha-sahitya-sangh-election : भाजप नेत्यांकडून सोशल मीडियावर पोस्ट, साहित्यिकांचा ‘बळी’, राजकारण्यांची ‘बाजी’
Nagpur विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. ज्येष्ठ साहित्यिक आणि वर्षानुवर्षे सक्रिय असलेल्या सारस्वतांच्या हाती संघाची धुरा जाईल, ही आशा फोल ठरली आहे. ही लढाई ‘साहित्यिक विरुद्ध राजकारणी’ अशी रंगली होती, ज्यामध्ये अखेर राजकारण्यांनी बाजी मारली आहे. विदर्भातील ‘सर्वपक्षीय सांस्कृतिक नेते’ अशी ओळख असलेले गिरीश गांधी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी साहित्यिकांनी मैदानात उतरण्याचा निर्धार केला. भाजपचे पाठबळ मिळताच गिरीश गांधींनी आपली रणनीती बदलली. या निवडणुकीत भाजपची सक्रियता लपून राहिली नाही. पक्षाच्या एका बड्या नेत्याने संपूर्ण संघटना गांधींच्या पाठीशी उभी केली होती. विशेष म्हणजे, राजकीय निवडणुकांप्रमाणेच येथेही ‘साम-दाम-भेदा’चा वापर झाल्याची चर्चा आहे. अनेक मतदारांना त्यांच्या नावे मतदान झाल्याचा पत्ताही लागला नाही; कोऱ्या मतपत्रिका भरून घेण्याचे प्रकार एका उमेदवाराच्या कार्यालयात घडल्याचे बोलले जाते.
Eknath shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना
गिरीश गांधींच्या विजयानंतर सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला. ज्यातील अनेकांचा साहित्याशी दुरान्वयेही संबंध नाही. शुभेच्छांमध्ये ‘कमळ’ चिन्हाचा झालेला वापर बरंच काही सांगून जातो. शरद पवारांचे ‘मानसपुत्र’ आणि यशवंतराव चव्हाणांचे पाईक म्हणवणारे गांधी, आता भाजपच्या छायेखाली वावरत आहेत. राष्ट्रवादीत असताना पक्षाची अवस्था बिकट झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा भाजपकडे वळवल्याचे स्पष्ट होते.
मुलाला महापालिकेत स्वीकृत सदस्यपद मिळवून दिल्यानंतर, आता थेट साहित्य संघावरच त्यांनी कब्जा मिळवला आहे. काँग्रेस विचारधारेच्या नेत्याला समोर करून संघ परिवाराने आणखी एक संस्था आपल्या अधिपत्याखाली आणल्याची चर्चा आता साहित्य वर्तुळात रंगली आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागला असून, साहित्यिकांच्या फौजेचा राजकारण्यांनी पराभव केला आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा प्रशासनाच्या उदासीनतेवर सभागृहात कडक प्रहार
राजकारणी गिरीश गांधी यांनी साहित्यिकांच्या आव्हानाला मोडीत काढत अध्यक्षपदावर नाव कोरले आहे. ही निवडणूक लोकशाही मार्गाने झाली असली, तरी त्यातील पडद्यामागच्या हालचाली पूर्णपणे राजकीय होत्या. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘संघटन’ बांधणीची सर्व ताकद गांधींच्या विजयासाठी पणाला लावली होती. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतपत्रिका गोळा केल्या, ज्यामुळे गांधींचा विजय सुकर झाला.
Devendra Fadnavis : धर्मांतर विधेयक मुस्लिमविरोधी नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
गांधींचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे; एकेकाळी शरद पवारांचे कट्टर समर्थक असलेले गांधी आज भाजपच्या पाठबळावर ही निवडणूक जिंकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना फारसे यश मिळाले नाही, मात्र भाजपने त्यांना आणि त्यांच्या मुलाला राजकीय बळ दिले. आजच्या निकालाने हे स्पष्ट केले आहे की, राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. या विजयामुळे विदर्भ साहित्य संघावर आता राजकीय विचारांचा पगडा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.








