व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Harshwardhan sapkal : काँग्रेसमध्ये ‘एकच गुन्हा, दोन न्याय’; हर्षवर्धन सपकाळ यांच्या कारवाईवर...

Harshwardhan sapkal : काँग्रेसमध्ये ‘एकच गुन्हा, दोन न्याय’; हर्षवर्धन सपकाळ यांच्या कारवाईवर कार्यकर्त्यांचा थेट सवाल!

Party workers questioning on harshwardhan sapkal action : यवतमाळ, वर्ध्यात तातडीने निलंबन; मग भंडारा-गोंदियात ‘नाना पटोले’ समर्थकाला अभय का?

Nagpur महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत धुसफूस आणि दुटप्पी कारभारावरून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. नागपूर-वर्धा आणि यवतमाळ विधान परिषद मतदारसंघातून पक्षाला अंधारात ठेवून परस्पर माघार घेणाऱ्या दोन उमेदवारांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निलंबनाचा बडगा उगारला खरा, मात्र हाच न्याय भंडारा-गोंदिया मतदारसंघातील उमेदवारांना का लावला नाही असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे.

शिस्तभंगाची कारवाई उमेदवाराचा ‘गॉडफादर’ कोण आहे हे पाहून ठरते का? अशी खोचक विचारणा आता काँग्रेसच्या निष्ठावंत वर्तुळातून होऊ लागली असून प्रदेशाध्यक्षांवर नेमका कुणाचा दबाव आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी पक्षाशी कोणतीही चर्चा न करता अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेना महायुतीचे दुष्यंत चतुर्वेदी हे बिनविरोध निवडून आले आहेत. दुसरीकडे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातूनही काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी ऐनवेळी निवडणुकीतून पळ काढल्यामुळे भाजप महायुतीचे उमेदवार अरुण लखानी हे अविरोध निवडून आले आहेत. या दोन्ही घटनांमुळे पक्षाची प्रचंड नाचक्की झाली असून याची गंभीर दखल घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तडकाफडकी या दोन्ही उमेदवारांच्या निलंबनाचे आदेश काढले. तुम्ही कोणाशीही चर्चा न करता परस्पर माघार घेऊन पक्षाला अडचणीत आणले असल्याचे या निलंबनाच्या आदेशात प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टपणे म्हटले आहे. मात्र, भंडारा-गोंदिया मतदारसंघातील ‘महानाट्या’वर मात्र प्रदेशाध्यक्षांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे. दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने जर यवतमाळ आणि वर्ध्यात पक्ष अडचणीत येतो, तर मग भंडारा-गोंदियात अधिकृत उमेदवारांनी माघार घेतल्याने पक्षाचे नुकसान झाले नाही का? तिथे नेमकी कोणती गुप्त ‘वाटाघाटी’ झाली, अशी संतप्त विचारणा आता पक्षाचे कार्यकर्ते उघडपणे करू लागले आहेत.

India gdp : जागतिक संकटांनाही भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार झेप

भंडारा-गोंदिया मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने दिलीप बनसोड आणि प्रफुल अग्रवाल या दोन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामध्ये बनसोड यांनी अर्जासोबत ‘एबी फॉर्म’ जोडला होता, तर अग्रवाल यांना ‘ए फॉर्म’ देण्यात आला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या दोन्ही उमेदवारांनी अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, उमेदवारी मागे घेणारे दिलीप बनसोड हे माजी प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ नेते नाना पटोले यांचे कट्टर समर्थक मानले जातात आणि त्यांच्याच शिफारशीने बनसोड यांना उमेदवारी देण्यात आली होती.

आता तेच निवडणुकीच्या रिंगणातून परस्पर बाहेर पडल्यामुळे या नामुष्कीची जबाबदारी कोण घेणार आणि पक्ष कोणावर खापर फोडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसमध्ये सर्व चालते, एकावर शिस्तभंगाची कारवाई होते तर दुसऱ्यावर होत नाही, शिस्तभंग करणारा कुठल्या नेत्याचा समर्थक आहे यावरूनच कारवाईची दिशा ठरते का, असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जात आहे.

भंडारा-गोंदिया मतदारसंघात अधिकृत उमेदवारांनीच ऐनवेळी माघार घेतल्यामुळे काँग्रेसची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. राष्ट्रीय पक्ष असूनही येथे काँग्रेसवर आता अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना समर्थन देण्याची नामुष्की ओढावली आहे.

Exit mva : महाविकास आघाडीत नाराजीचा स्फोट? मविआतून बाहेर पडण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव

येथे भाजप-महायुतीने अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी दिली असून आता त्यांचा सामना काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर आणि दुसरे अपक्ष सचिन कुंभलकर यांच्याशी होणार आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडल्यामुळे आणि पक्षात अंतर्गत यादवी माजल्यामुळे या संपूर्ण घडामोडींचा थेट फायदा भाजप महायुतीच्या उमेदवाराला होणार असल्याचे स्पष्टपणे बोलले जात आहे.

एरवी रोखठोक भूमिका मांडणारे आणि कडक शिस्तीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण केली. मात्र, विधान परिषदेच्या तिकीट वाटपापासून ते उमेदवारांच्या बंडखोरीपर्यंत त्यांच्या निर्णयक्षमतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सपकाळ यांच्या अशा दबावाखालील भूमिकेचा इतिहास नवा नाही; यापूर्वीही सपकाळ यांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत…

error: Content is protected !!