Khamgao APMC : माझी पत्नी परत द्या! कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात धक्कादायक वळण

Husband alleges that Director Vaishali Mujumale is being confined : संचालिका वैशाली मुजुमले यांना डांबून ठेवल्याचा पतीचा आरोप

Khamgao स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्तासंघर्ष चिघळत असून, सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधात १८ विरुद्ध १३ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर राजकारणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. १४ नोव्हेंबर रोजी स्व. विलासराव देशमुख सभागृहात खास सभा आयोजित असताना, संचालिका वैशाली मुजुमले यांच्या पतीने केलेल्या गंभीर आरोपांनी बाजार समितीतील वातावरण तापले आहे.

दिलीप वसंतराव मुजुमले यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले की, “दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील, स्वप्निल ठाकरे आणि त्यांचे सहकारी आमच्या घरी आले. निवडणुकीच्या चर्चेच्या नावाखाली मला आणि माझ्या पत्नीला वेगवेगळ्या गाड्यांत बसवून शेगावला नेण्यात आले.”

Local Body Elections : शिवसेनेचा (शिंदे) ‘पहिला’ उमेदवारी अर्ज दाखल

ते पुढे म्हणाले— “मला हॉटेलमध्ये ४–५ जणांनी डांबून ठेवले; पत्नीला ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या बंगल्यावर नेले.” पत्नीला सोडून देण्याची विनंती केली असता, “निवडणूक झाल्यावर पाहू”, असे सांगण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला.

“गुरुवारी सकाळी त्यांच्या तावडीतून कसाबसा निसटून आलो. लगेच हिवरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. माझ्या पत्नीला माझ्या ताब्यात द्यावे आणि आम्हाला स्वातंत्र्याने मतदान करू द्यावे,” असे तक्रारीत नमूद केले आहे.

हिवरखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार प्राप्त झाली असून प्रकरण चौकशीवर ठेवण्यात आले आहे. उशिरा रात्रीपर्यंत पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू होती.

Local Body Election : ‘दुसरी फळी’ सक्रिय; वरिष्ठ नेते संकोचात!

या गंभीर आरोपांनंतर अविश्वास ठरावाच्या सभेपूर्वी खामगाव कृउबासमध्ये मोठी राजकीय खळबळ माजली आहे. सत्तेचा संघर्ष, संचालकांचे तंटे आणि आता ‘अपहरणासमान’ आरोप — यामुळे आगामी सभेचे महत्त्व आणखी वाढले आहे.