व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local Body Election : ‘दुसरी फळी’ सक्रिय; वरिष्ठ नेते संकोचात!

Local Body Election : ‘दुसरी फळी’ सक्रिय; वरिष्ठ नेते संकोचात!

Political Equations of Candidature, Factionalism, and Strategies : उमेदवारी, गटबाजी आणि रणनीतींनी राजकीय समीकरणे ढवळून निघाली

Khamgao आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खामगावच्या राजकारणात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. शहरातील दुसऱ्या फळीतील नेते पुढे सरसावत असून वरिष्ठ नेत्यांच्या ‘डोकेदुखी’त भर पडली आहे. उमेदवारांची निवड, पक्षांतर्गत गटबाजी आणि नव्या राजकीय हातमिळवणींमुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होत आहेत.

शहरात भाजपा आणि शिंदेसेनेतील समन्वयाचा अभाव आता उघडपणे दिसू लागला आहे. शिंदेसेनेचा एक गट भाजपसोबत तर दुसरा गट तिसऱ्या पर्यायासोबत असल्याच्या चर्चांनी राजकारण तापले आहे. युती धर्माची मोठी परीक्षा यावेळी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अजूनही कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नसल्याने शहरातील राजकीय वातावरणात मोठी अनिश्चितता आहे. बंडाळीचा धोका टाळण्यासाठी पक्षश्रेष्ठी गोपनीयतेचा मुलामा देत बारकाईने उमेदवारीचे गणित मांडत आहेत. मात्र, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

Local body election : निवडणुकांची घोषणा होताच सर्व पक्षांनी रणशिंग फुंकले

तिकीट न मिळाल्यास बंडखोरीची शक्यता आहे. काही ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठका सुरू असून स्वतंत्र पॅनल उभे करण्याच्या चर्चांना वेग आला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील गटबाजी अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या फळीतील नेते आपली पकड घट्ट करण्यासाठी सक्रिय झाले असून वरिष्ठ नेत्यांसाठी स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. खामगावची नगरपालिका निवडणूक यावेळी चुरशीची आणि महत्त्वाची ठरेल, असा अंदाज सर्वत्र व्यक्त होत आहे.

Delhi blast case : कारब्लास्टचा मुख्य आरोपी उमर मोहम्मदचे घर केले उद्ध्वस्त !

या निवडणुकीत महिला व तरुणांचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत. महिला स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत आहेत, तर तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार मोहीम आखत आहेत. पक्षांनीही नव्या चेहऱ्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे.

चार दिवस उलटूनही नगरसेवक पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. नगराध्यक्षपदासाठी शिरीन वसीम पठाण यांनी गुरुवारी एकमेव अर्ज दाखल केला असला तरी नगरसेवक पदासाठी इच्छुक अजूनही ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत आहेत. नामांकन दाखल करण्यासाठी आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत.

error: Content is protected !!