Breaking

Krushna Khopde : कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करा!

MLA demands dismissal of the board of directors of the Agricultural Produce Market Committee : आमदार खोपडे विधानसभेत आक्रमक; भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी

Nagpur कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी देखील केली. यासंदर्भात त्यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली होती.

२०१७ मध्ये ए.डी.पाटील व २०२३ मध्ये खंडागळे समितीच्या चौकशी अहवालावरून हे स्पष्ट लक्षात येत आहे. त्यामुळे अशा भ्रष्ट संचालक मंडळाला तात्काळ बरखास्त करा व त्याठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करा. भ्रष्ट्राचाराला जागा देणाऱ्या राजेश भुसारी यांच्या संपत्तीची चौकशी करा. वेळ आलीच तर संपत्ती जप्त करा, अशी मागणी खोपडे यांनी केली.

Municipal Council school : नगरपरिषद शिक्षकांच्या पेन्शनची फाईल मुख्यमंत्र्यांकडे

जुलै २०१७ मध्ये ए.डी. पाटील जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांचा चौकशी अहवाल शासनास सादर झाला. या चौकशी अहवालात नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती व संचालक मंडळाचा भ्रष्टाचार उघडकीस आला असून संचालकांनी स्वतःचा परिवाराचा नावाने गाळे घेणे व स्वतः सभापती यांनी परिवारातील सदस्यांना गाळे आवंटीत करणे, सभापती यांनी एकट्यानेच अधिकार नसताना दोन गाळ्याचे सबलिज रजिस्टर करून घेणे, लिलाव न करता मनमर्जीप्रमाणे संचालक व अन्य लोकांना थेट गाळे देणे, या सर्व प्रकरणात तत्कालीन सचिवांचा देखील समावेश आहे, असं खोपडे म्हणाले.

NCP Sharad Pawar : शरद पवारांनी भाकरी फिरवलीच; जयंत पाटलांचा अखेर राजीनामा

त्यानंतर एक सदस्यीय पी.एल. खंडागळे समितीचा १४ पानी चौकशी अहवाल पणन संचालकांना २०२३ मध्ये सादर करण्यात आला. या अहवालानुसार एपीएमसीच्या बकरामंडी सेसच्या माध्यमातून ५१ दलाल व अधिकाऱ्यांनी २० वर्षात फक्त ९५ हजार रुपये सेस दाखवून तब्बल ४० कोटींचा वर महसूल बुडविल्याचा अंदाज आहे. त्या दलालांचे परवाने रद्द करून रक्कम वसुली करण्याचे पणन संचालक यांनी आदेश दिले. मात्र सचिवांनी संचालकांच्या दबावामधे जाणीवपूर्वक कारवाईत विलंब करून दलालांना न्यायालयात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे सदर प्रकरणाला स्थगिती मिळाली, असा आरोप खोपडे यांनी केला.