Ladki Bahin Scheme : ग्रामपंचायत अधिकाऱ्याने ‘लाडकी बहीण’चा लाभ घेतल्याने खळबळ

Gram Panchayat officer availed the scheme’s benefits : गलेलठ्ठ पगार असूनही सरकारी योजनांतील पैशांवर नजर

Deulgao Raja : सामान्य कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनीच बोगस लाभ घेतल्याची प्रकरणे राज्यभरात उघड होत आहेत. त्यातच देऊळगाव राजा तालुक्यातील एका महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याने तब्बल वर्षभर या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड होताच राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

ग्रामपंचायत अधिकारी मंदाकिनी वाघ यांच्या नावावरून १२ हप्त्यांचे पैसे थेट बँक खात्यात जमा झाले, अशी माहिती पडताळणीत समोर आली. दरमहा मिळणारे दीड हजार रुपये गलेलठ्ठ पगारावर उपजीविका करणाऱ्या अधिकाऱ्यांनी घेतल्याने लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी, कष्टकरी महिला अर्जासाठी रांगेत उभ्या असताना अधिकारीच या योजनेत घुसखोरी करत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

Uddhav Balasaheb Thackarey Shivsena : ठाकरे सेनेचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव, १ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा

या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर शासनाची फसवणूक झाली आहे, असे मानले जात असून प्रशासन काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी “मी अर्ज केलेला नाही, नातेवाइकांनी माझ्या नावाने अर्ज दाखल केला” अशी सफाई दिली. मात्र बँकेत पैसे जमा झालेले नाकारता येत नसल्याने ही बाब अधिक वादग्रस्त ठरत आहे.

या संदर्भात एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी तारामती मुंडे यांनी सांगितले की, “ग्रामपंचायत अधिकारी यांनीच अर्ज दाखल केल्याचे त्यांनी मला सांगितले होते. त्यांना लेखी स्वरूपात लाभ न घेण्याच्या सूचना दिल्या असून, घेतलेली रक्कम शासनाकडे परत करण्याचे सांगितले आहे.”

Maratha Reservation : ओबीसी आरक्षणावर गदा घालणारा शासन निर्णय रद्द करा!

राजकीय जाणकारांच्या मते, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बोगस लाभामुळे योजनेंतर्गत खर्‍या लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे विरोधक आता सरकारला धारेवर धरत असून, या प्रकरणाचा आगामी निवडणुकांवर राजकीय प्रभाव पडणार, यात शंका नाही.