व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Legislative Council election : विधान परिषदेसाठी पडद्यामागची खेळी; बुलढाण्यात राजकीय तापमान वाढले

Legislative Council election : विधान परिषदेसाठी पडद्यामागची खेळी; बुलढाण्यात राजकीय तापमान वाढले

Shinde-sananda-kazi may be in race for legislative council election : शिंदे-सानंदा-काझी शर्यतीत; पण अंतिम निर्णय अजूनही अनिश्चित

Buldhana विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना अचानक वेग आला असून, विविध गट-तट आपापली ताकद आजमावण्याच्या तयारीत आहेत. वरकरणी काही ठराविक नावे चर्चेत असली, तरी प्रत्यक्षात पडद्यामागे सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे अंतिम समीकरणे सतत बदलत असल्याचे चित्र आहे.
सध्या जिल्ह्यातून विजयराज शिंदे, दिलीपकुमार सानंदा आणि अॅड. नाझेर काझी ही नावे आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. मात्र, या नावांमागे स्वतंत्र लॉबी कार्यरत असून, प्रत्येक गट ‘आपला उमेदवार’ पुढे आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

राजकीय वर्तुळात संपर्क, गुप्त बैठका आणि दबावतंत्र यांचा वापर वाढल्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक नेत्यांपासून थेट राज्यस्तरीय नेतृत्वापर्यंत धागेदोरे हलवले जात असल्याने ही शर्यत केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता व्यापक स्वरूप घेत आहे. त्यामुळे आज जे नाव पुढे दिसत आहे, ते शेवटच्या क्षणी मागे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Malkapur municipal council : नगरपरिषद ‘अकार्यक्षम’; प्रहारकडून घागर पुजून श्राद्ध आंदोलन

बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात शेवटच्या क्षणी ‘तिसरेच’ नाव पुढे येण्याची परंपरा यापूर्वीही दिसून आली आहे. त्यामुळे सध्याच्या चर्चेत असलेली नावे अंतिम ठरतीलच, याबाबत अनिश्चितता कायम आहे. यामुळेच इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. एमएलसीची ही शर्यत केवळ व्यक्तींची नसून राजकीय ताकद, लॉबिंग आणि प्रभाव यांची खरी कसोटी ठरत आहे. आगामी काही दिवसांत या हालचाली अधिक वेग घेण्याची शक्यता असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!