Local Body Elections : अकोला महापालिकेत तीन वर्षांनंतर प्रशासकराज संपणार

Akola Municipal Corporation to get elected body after three years : मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या २७ डिसेंबरला, राजकीय हालचालींना वेग

Akola बहुप्रतीक्षित अकोला महापालिका निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला आहे. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुसार शहरातील राजकीय पक्षांचे फलक, बॅनर व झेंडे हटविण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला देण्यात आले आहेत.

निवडणूक प्रक्रियेसाठी तीन ते चार प्रभागांचा मिळून एक गट असा एकूण सहा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेचे प्रमुख निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सोमवारी दिली.

महापालिकेची मागील सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्या पंचवार्षिक कार्यकाळाची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपली. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेत प्रशासकराज होते. आता तब्बल आठ वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने १६ जानेवारीपासून महापालिकेला नवे लोकप्रतिनिधी मिळणार आहेत.

Local Body Elections : नऊ जागांसाठी रणधुमाळी नाहीच! तीन पालिकांची निवडणूक; प्रचाराचा सूर मंद

तीन वर्षांपासून समस्या ‘जैसे थे’

प्रशासकराजाच्या काळात शहरातील अनेक मूलभूत प्रश्न कायम राहिले आहेत.
सांडपाणी व्यवस्थापनाचा बोजवारा : मालमत्ता कर व पाणीपट्टीत भरमसाठ वाढ झाली असली तरी वाढीव वसाहतींमध्ये गटारी व नाल्यांचा अभाव आहे.
डासांचा उपद्रव : साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.
रस्त्यांची दुरवस्था : अनेक भागांत अद्याप पक्के रस्ते नाहीत.
नायगाव प्रभाग क्रमांक १ (अल्पसंख्याक बहुल वसाहत) येथे पक्के रस्ते, पथदिवे व पक्क्या नाल्यांचा प्रश्न कायम आहे.

Lonar Lake : १५ फूट पाण्याखाली गेले कमळजा देवीचे मंदिर

चर्चेतील प्रभाग व प्रश्न

वाहतूक कोंडी : डाबकी रोड रुंदीकरणासाठी खोदून ठेवलेला मुख्य वर्दळीचा रस्ता व अतिक्रमण साहित्यामुळे वाहतूक कोंडी.
हॉकर्सचे अतिक्रमण : गांधी रोड व बाजारपेठ परिसरात अतिक्रमण ‘जैसे थे’.
भटकी कुत्री व मोकाट गुरे : उपद्रव वाढला.
अल्पसंख्याक बहुल प्रभाग : नायगाव व शिलोडा या दोन प्रभागांतून २०१७ मध्ये काँग्रेसचे १३ पैकी १२ नगरसेवक निवडून आले होते.

डाबकी रोड भागात भाजपचे वर्चस्व असून शिवसेनेचेही प्राबल्य आहे. पश्चिम विधानसभा मतदारसंघात मात्र काँग्रेसचा विजय झाला होता. रामनगर, जठारपेठ प्रभागांत भाजपचे माजी महापौर व दिग्गज नेते वास्तव्यास आहेत. गोरक्षण रोड, कौलखेड परिसरात रस्सीखेच अपेक्षित आहे.

Crime News : जिवंत आईला ‘मृत’ दाखवून १० लाखांचा घोटाळा; मुलाकडून बनावट मृत्युपत्राचा खेळ

२०१७ मधील पक्षीय बलाबल

भाजप : ४८
काँग्रेस : १३
शिवसेना : ८
राष्ट्रवादी काँग्रेस : ५
एमआयएम : ५
वंचित बहुजन आघाडी : ३
इतर : २

महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर दुबार नावे व इतर त्रुटींसंदर्भात एकूण १,४७५ हरकती दाखल झाल्या होत्या. या सर्व हरकतींचे निराकरण करण्यात आले असून, ५ लाख ५० हजार ६० मतदारांची अंतिम यादी अधिप्रमाणित करण्यात आली आहे.

ही अंतिम मतदार यादी शहरातील चारही झोन कार्यालयांत प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या २७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती महापालिका निवडणूक विभागाचे प्रमुख अनिल बिडवे यांनी दिली.

MSRTC : परिवहन विभागाच्या नावाखाली होतेय नागरिकांची फसवणूक

पक्षांतर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील राजेश मिश्रा, प्रमिला गिते, राजकुमारी मिश्रा व गजानन चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.

वंचित बहुजन आघाडी : पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमधून आलेल्या डॉ. झिशान हुसेन यांना उमेदवारी दिली होती; मात्र ऐनवेळी ती मागे घेण्यात आली होती.

भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही इच्छुकांची चाचपणी सुरू आहे.