व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local Body Elections : नऊ जागांसाठी रणधुमाळी नाहीच! तीन पालिकांची निवडणूक; प्रचाराचा...

Local Body Elections : नऊ जागांसाठी रणधुमाळी नाहीच! तीन पालिकांची निवडणूक; प्रचाराचा सूर मंद

26 candidates in the fray as polling set for December 20 : २० डिसेंबरला मतदान; २६ उमेदवार रिंगणात, मात्र राजकीय हालचाली संथ

Khamgao न्यायालयाच्या निर्णयानंतर घाटाखालील खामगाव, जळगाव जामोद आणि शेगाव नगर परिषदांतील नऊ सदस्यांच्या जागांसाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत एकूण २६ उमेदवार रिंगणात असून, उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर अधिकृत प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र अपेक्षित राजकीय हालचाली व उत्साहाचा अभाव जाणवत असून, सध्या प्रचाराचा माहोल थंडावलेला असल्याचे चित्र दिसत आहे.

नगर परिषद निवडणुकांदरम्यान तांत्रिक व कायदेशीर कारणांमुळे काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर बाद ठरविण्यात आलेल्या उमेदवारांना अर्ज माघारीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने सुधारित वेळापत्रकानुसार ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार या तीन नगर परिषदांतील नऊ जागांसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. सुधारित कार्यक्रमानुसार बुधवारी (दि. १०) उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे.

Lonar Lake : १५ फूट पाण्याखाली गेले कमळजा देवीचे मंदिर

नगर परिषद निवडणुकीसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, २१ डिसेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांनाही निकालाची उत्सुकता लागली आहे.

राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ऑटोरिक्षांच्या माध्यमातून घराघरांत संपर्क साधत असले, तरी शहरांमध्ये निवडणुकीचा अपेक्षित जल्लोष दिसून येत नाही. प्रत्यक्ष प्रचारापेक्षा सोशल मीडियावरच प्रचार अधिक केंद्रित झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Crime News : जिवंत आईला ‘मृत’ दाखवून १० लाखांचा घोटाळा; मुलाकडून बनावट मृत्युपत्राचा खेळ

बहुतांश जागांची निवडणूक प्रक्रिया यापूर्वीच पार पडल्याने आता केवळ मोजक्या जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे मोठ्या जाहीर सभांची शक्यता कमी असून, काही ठिकाणी लहान प्रमाणातील कॉर्नर सभांद्वारे प्रचार केला जाणार असल्याची माहिती पक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

जळगाव जामोद येथील तीन जागांवर तिरंगी लढत होत असून, शेगावातील एका जागेवर थेट तर एका जागेवर पाच उमेदवारांमध्ये लढत आहे. खामगावातील चारही जागांवर तिरंगी व चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे.

MSRTC : परिवहन विभागाच्या नावाखाली होतेय नागरिकांची फसवणूक

नऊ जागांपैकी काही ठिकाणी भाजपच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्याने त्या ठिकाणी पक्षाकडून अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला आहे. जागांची संख्या कमी असली, तरी नगर परिषदांतील सत्ता-समीकरणांच्या दृष्टीने या निवडणुका महत्त्वाच्या असल्याने भाजपकडून सर्व जागांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

खामगाव नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक ५-अ, ७-अ, २-ब व १६-ब; जळगाव जामोद येथील प्रभाग क्रमांक ६-अ, ६-ब व ७-ब; तसेच शेगाव नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक ४-अ व ४-ब या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

error: Content is protected !!