Deadlock Over Mayoral Posts Continues; Power-Sharing Dispute Reaches State Level : बुलढाणा, मेहकर, खामगाव, मलकापूरसह आठ नगरपरिषदांमध्ये अडचणी वाढल्या; १४ नोव्हेंबरनंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता!
Buldhana जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद निवडणुका २०२५ च्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे तापली असून, नगराध्यक्षपदांवरून महायुती आणि महाविकास आघाडीतील वाद थेट राज्यस्तरावर पोहोचले आहेत. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांपैकी आठ ठिकाणी नगराध्यक्षपदावरून निर्माण झालेला तिढा अजूनही सुटलेला नाही.
स्थानिक पातळीवरील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता दोन्ही आघाड्यांचे नेते मुंबईत उच्चस्तरीय पातळीवर बैठका घेत आहेत. पक्षनिष्ठा, स्थानिक नेतृत्वाचा दबाव, स्वबळाचा सूर आणि गत निवडणुकांतील संख्याबळ यामुळे दोन्ही आघाड्यांतील समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. १४ नोव्हेंबरनंतर दोन्ही आघाड्यांची भूमिका स्पष्ट होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Local Body Elections : भाजपात उमेदवारीसाठी चढाओढ, एकमेकांच्याच विरोधात उभे ठाकले!
महाविकास आघाडीतही नगराध्यक्षपदांच्या वाटपावरून मतभेद शिगेला पोहोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) — सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मेहकर, जळगाव जामोद आणि शेगाव या ठिकाणांसाठी आक्रमक आहे. उद्धवसेना — बुलढाणा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, जळगाव जामोद आणि नांदुरा या नगराध्यक्षपदांवर आग्रही आहे. काँग्रेस — बुलढाणा, चिखली, मेहकर, लोणार आणि मलकापूर या जागांवर ठाम भूमिका घेत आहे.
विशेष म्हणजे, मेहकर नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि उद्धवसेना दोघेही हट्टावर, तर सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा राष्ट्रवादीकडे देण्याची आघाडीतील चर्चा सुरु आहे. मात्र, तडजोडीच्या फेर्या असूनही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही.
Local Body Elections : २५ वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्यांनी रात्रीतून बदलला पक्ष!
दुसरीकडे, महायुतीमध्येही अंतर्गत तणाव वाढला आहे. अजित पवार गट — सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि मलकापूर या नगराध्यक्षपदांवर हक्क सांगत असून, मलकापूर न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. शिंदेसेना — मेहकर, लोणार, बुलढाणा, देऊळगाव राजा आणि जळगाव जामोद या नगराध्यक्षपदांवर दावा करीत आहे. भाजप — खामगाव, नांदुरा, शेगाव, मलकापूर आणि जळगाव जामोद येथे सर्वसमावेशक उमेदवार देण्याचा विचार करत असून, बुलढाणा व सिंदखेड राजा यांवर विशेष लक्ष केंद्रित आहे.








