Obstruction in the voting process; police officer manhandled : दमदाटी करणाऱ्या आरोपीविरुध्द गुन्हा दाखल
Mehkar जिजामाता माध्यमिक कन्या शाळा, मेहकर येथे मतदानाच्या दिवशी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी समाधान परमेश्वर बोडखे (वय 40, रा. मिलींद नगर, मेहकर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 तसेच लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्याद अशोक शालीकराम अवचार (वय 36), सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन मेहकर यांनी दिली आहे. फिर्यादी मतदानाकर्तव्य पार पाडत असताना 2 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3.30 वा. आरोपीने मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करत दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : घरकरातील ५०% सवलतीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?
फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, आरोपी बोडखे यांनी “मला शिकवू नका, मला तात्काळ सीएम साहेबांचा फोन येईल”, “तुमचं वय काय? किती सेवा झाली?” अशा शब्दांत धमकावत धाकदपटशा केली. पुढे “तुम्हीच इथून निघा” असे म्हणत त्यांनी शासकीय गणवेशातील अधिकाऱ्याला ढकलल्याचे फिर्यादींनी नमूद केले. तसेच “नंतर पाहून घेतो, मी काय करू शकतो ते तुम्हाला माहिती नाही” असा इशाराही आरोपीने दिला असल्याचे तक्रारीत सांगितले आहे.
Municipal results : नगरपालिकांच्या निकालावर कोणताही बदल नाही
या कृत्यामुळे लोकसेवक असलेल्या फिर्यादींच्या शासकीय कर्तव्यांमध्ये अडथळा निर्माण झाला. फिर्यादींच्या लेखी तक्रारीवरून अपराध क्र. 739/2025 नुसार कलम 132, 121(1), 351(2) भारतीय न्याय संहिता 2023 तसेच कलम 130(1), 130(2) लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सपोनि संदीप बिरांजे यांच्याकडे सोपविण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.








