Gram Panchayat neglecting the 50% concession on house tax : शिवसेनेचा इशारा, ८ डिसेंबरपासून डफडे बजाव आंदोलन व आमरण उपोषण”
Malkapur ग्रामस्थांना घरकरात ५० टक्के सूट देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत प्रशासन अडचणीत सापडले आहे. शासनाने स्पष्ट निर्देश दिले असूनही ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामसेवक यांनी हा निर्णय लागू न केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
याच निषेधार्थ ८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने दिला आहे. ४ डिसेंबर रोजी गटविकास अधिकारी नारखेडे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
१३ नोव्हेंबर २०२५ रोजी ग्रामविकास विभागाने ‘समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत’ थकीत घरकर एकरकमी भरल्यास ५०% सूट देण्याचा आदेश जारी केला आहे.
Municipal results : नगरपालिकांच्या निकालावर कोणताही बदल नाही
या निर्णयाची ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत असल्याने फक्त २५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. तरीही मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतीने हा निर्णय लागू न केल्याने ग्रामस्थांवर अनावश्यक आर्थिक भार पडत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.
शिवसेनेचे म्हणणे आहे की, ग्रामस्थांना देण्यात येणारी सूट जाणीवपूर्वक रोखून धरली जात असून करदात्यांना त्याचा लाभ मिळू दिला जात नाही. निवेदनात स्पष्ट मागणी करण्यात आली आहे की मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील सर्व करदात्यांना तीन दिवसांत ५०% सूट देऊन कर वसुली करावी.
अन्यथा ८ डिसेंबरपासून डफडे बजाव आंदोलन व आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. या निवेदनावर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहरप्रमुख हरिदास गणबास, युवासेना शहरप्रमुख मंगेश सातव, तसेच अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थांची स्वाक्षरी आहे.
ग्रामपंचायतीच्या या भूमिकेमुळे स्थानिक प्रशासनावर निवडक अंमलबजावणी केल्याचे आरोप होत आहेत. अंतिम मुदत जवळ येत असताना शासन निर्णयाचा लाभ न दिल्यास मोठ्या आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे.








