Congress party’s strength increased in the Lonar Municipal Council : लोणार नगरपरिषद निवडणुकीत ८०० मतांचा लीड, सर्वाधिक मताधिक्याने विजय
Lonar लोणार नगरपरिषदेतील काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेविका तथा माजी आरोग्य सभापती सीमाताई नितीन शिंदे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागात ही अधिकृत प्रक्रिया पार पडली.
यावेळी नगरपरिषद अध्यक्षा मीराताई भूषण मापारी, काँग्रेसचे आठ नगरसेवक, पाच अपक्ष नगरसेवक तसेच एमआयएम पक्षाच्या एका नगरसेवकाने सीमाताई शिंदे यांना पाठिंबा दर्शवित गटनेतेपदी विराजमान केले. त्यामुळे लोणार नगरपरिषदेत काँग्रेसची राजकीय पकड अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Akola municipal corporation election : १६४ उमेदवारांची माघार; ४६९ आजमावणार नशीब
सीमाताई नितीन शिंदे यांनी सन २०१४ ते २०१९ या कालावधीत नगरसेविका म्हणून काम करताना आरोग्य सभापतीसह विविध समित्यांचे सभापतीपद यशस्वीपणे भूषविले आहे. मागील कार्यकाळातील प्रभावी व लोकाभिमुख कामगिरीची पावती म्हणून यावेळी त्यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्षा मीरा भूषण मापारी यांच्या खांद्याला खांदा लावून “उल्कानगरीचा सर्वांगीण व वेगवान विकास” करण्याचा निर्धार सीमाताई शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यामुळे नगरपरिषदेवर खऱ्या अर्थाने महिलाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोणार नगरपरिषदेतील दहा प्रभागांतील २० उमेदवारांपैकी सीमाताई नितीन शिंदे या सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्या आहेत. त्यांनी प्रभाग क्रमांक ४ मधून तब्बल ८०० मतांचा लीड घेत विजय मिळविला. या दणदणीत विजयाचे सर्वत्र कौतुक होत असून, गटनेतेपदाची संधी मिळाल्याने त्या या संधीचे सोने करून काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.








