rename buldhana as Jijaunagar, mla demands in maharashtra assembly : ऐतिहासिक वारसा, सिंचन टंचाई आणि बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा
Buldhana राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून ‘जिजाऊनगर’ करण्याच्या मागणीसह मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांवर चर्चा करण्यात आली. राजमाता जिजाऊंचे माहेरघर असलेल्या या जिल्ह्याला त्यांच्या नावाने ओळख मिळावी, हा ऐतिहासिक प्रस्ताव मांडतानाच जिल्ह्याचा वारसा जपण्यासाठी विशेष पावले उचलण्याची गरज सभागृहात व्यक्त करण्यात आली.
चिखली तालुक्यातील करवंड हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सासर असून, येथील ऐतिहासिक वास्तूंची सध्याची दुरवस्था पाहता तिथे पर्यटन केंद्र आणि भव्य स्मारक उभारण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. जिल्ह्याचा ऐतिहासिक ठेवा जतन केल्यास पर्यटन वाढून स्थानिक रोजगाराला चालना मिळेल, अशी भूमिका मांडण्यात आली.
मतदारसंघात आतापर्यंत ५७ बंधारे पूर्ण झाले असले तरी, वाढत्या दुष्काळाचा विचार करता आणखी किमान ७५ बंधारे आणि नवीन धरणांची तातडीने आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विशेषतः मोताळा तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, हे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, याकडे लक्ष वेधण्यात आले.
जिल्ह्यात वाढणारा अमली पदार्थांचा वापर आणि त्यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये वाढलेली गुन्हेगारी यावर चिंता व्यक्त करण्यात आली. पोलिसांनी कडक पावले उचलून ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करावे आणि ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी गस्त वाढवावी, अशा सूचना गृहमंत्रालयाला देण्यात आल्या. तसेच, आरोग्य विभागातील अपूर्ण प्रकल्प आणि एमआरआय (MRI) सेवेची कमतरता यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असल्याचे सांगत ही सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
Band artists : ‘डीजे बंद करा’ची मागणी; बँड कलाकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
स्थानिक व्यापाराला गती देण्यासाठी दुकाने रात्री उशिरापर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी मिळावी आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या पोलीस परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करावी, अशा विविध मागण्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना विधानसभेत वाचा फोडण्यात आली.








