Mahayuti Government : जिल्हा पुरवठा कार्यालयात २३.५७ लाखांची अफरातफर!

23.57 lakhs scam in District Supply Office : एपीएल शेतकरी निधी लाटला; कंत्राटी कर्मचाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा

Amravati जिल्हा पुरवठा कार्यालयात तब्बल २३ लाख ५७ हजार रुपयांची आर्थिक अफरातफर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासननियुक्त त्रयस्थ संस्थेमार्फत नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यासह चौघांनी एपीएल शेतकरी लाभार्थ्यांसाठी असलेला निधी स्वतःच्या खात्यात वळविल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अभिजीत भुस्कडे (रा. दुर्गाविहार, अमरावती), हेमंत सूर्यवंशी (३०) आणि दोन महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा १९ ऑगस्ट रोजी दाखल केला.

१ ऑक्टोबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान कंत्राटी कर्मचारी अभिजीत भुस्कडे एपीएल डीबीटी योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात न टाकता स्वतःच्या आणि इतर तिघांच्या खात्यात वळवीत होता. या काळात तो जिल्हा पुरवठा कार्यालयात तांत्रिक कर्मचारी म्हणून कार्यरत होता. नवीन कर्मचाऱ्याने डेटा पडताळणी केली असता प्रकार उघड झाला. तपासात समोर आले की, भुस्कडे आणि हेमंत सूर्यवंशी हे लाभार्थी नसतानाही त्यांच्या खात्यात लाखोंची रक्कम जमा झाली.

Parashuram Corporation : परशुराम महामंडळाला गती; व्याज परतावा योजना जाहीर

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनुदानाच्या यादीची मागणी केल्यानंतर भुस्कडे टाळाटाळ करू लागला. त्यामुळे संशय आल्याने चौकशी सुरू झाली. २५ एप्रिल २०२४ रोजी चौकशी समिती नेमण्यात आली; परंतु भुस्कडेनं आवश्यक कागदपत्रे दिली नाहीत. अखेर डेटा पडताळणीदरम्यान प्रसाद रायटे यांना हा प्रकार लक्षात आला.

Uddhav Balaseb Thackeray : केंद्र सरकारमुळे शेतकरी हवालदिल, उद्धव गटाचा हल्लाबोल

शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. यात शेतकरी शिधापत्रिकाधारकांना धान्याऐवजी प्रतिव्यक्ती प्रतिमाह १५० रुपये (आताची रक्कम १७० रुपये) थेट बँक खात्यात पाठवली जाते. हाच निधी आरोपींनी लाटल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. गाडगेनगर पोलिसांनी दोन पुरुष आणि दोन महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान अन्य आरोपींचा सहभागही स्पष्ट होईल, असे ठाणेदार अतुल वर यांनी सांगितले.