manoj-jarange-patil-agitation-uday-samant-pratap-sarnaik-maratha-reservation : ‘समर्थक आमचेही आहेत’ म्हणत उदय सामंतांचा इशारा
Chhatrapati Sambhajinagar : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आमरण उपोषण बाराव्या दिवशीही कायम असून, सरकार आणि आंदोलकांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. सरकारने जरांगे यांच्या १२ मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही केल्याचा दावा केला असला, तरी एकही मागणी मान्य झालेली नसल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रशासन तसेच आरक्षण समितीची बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत सामंत यांनी मराठा समाजासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. मराठवाड्यात २१ हजार ५१ जात प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली असून, त्यापैकी १६ हजार ११० प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. सुमारे दोन हजार प्रकरणे प्रलंबित असून तीही लवकरच निकाली काढली जातील, असा दावा त्यांनी केला. या प्रक्रियेमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.
Mundhwa land Scam : पार्थ पवारांना आरोपी का केले नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारावर हायकोर्टाचा सवाल
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या नेत्यांबाबत वापरलेल्या भाषेवर नाराजी व्यक्त करताना, ‘जसे जरांगे पाटलांचे समर्थक आहेत, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक आहेत,’ असे सामंत म्हणाले. आंदोलनामुळे वातावरण चिघळू नये, यासाठी संयम राखण्याचे आवाहन त्यांनी केले. पोळा आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला स्थगिती द्यावी, अशी विनंतीही त्यांनी जरांगे पाटील यांना केली.
दरम्यान, सामंत यांच्या भूमिकेवर जरांगे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘रस्त्यावर उतरू’ असा इशारा दिल्याचा संदर्भ देत जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. दबाव किंवा गुंडगिरीच्या भाषेला आपण घाबरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंडरवर्ल्डचे दिवस संपले असून, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास त्याला विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
Rajendra Shingne : राजेंद्र शिंगणेंचा वनवास संपला, १४ वर्षांनंतर बुलढाणा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी
या संघर्षाची धग आता राज्यभर पोहोचली आहे. नांदेडच्या हदगावमध्ये मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचे बॅनर फाडले. नाशिकच्या चांदवडमध्येही रास्ता रोको करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दोन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे सरकारचा संवाद आणि संयमाचा आग्रह विरुद्ध आंदोलकांचा आक्रमक पवित्रा, अशी स्थिती निर्माण झाली असून पुढील काही दिवस मराठा आरक्षण आंदोलनाच्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
___








