व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Bacchu Kadu : वनविभागात ‘एक दिवसाचा गणपती’ बसवू; बच्चू कडूंचा इशारा

Bacchu Kadu : वनविभागात ‘एक दिवसाचा गणपती’ बसवू; बच्चू कडूंचा इशारा

Bachchu Kadu demands measures to curb the menace of wild animals : वन्य प्राण्यांची दहशत थांबवण्यासाठी बंदोबस्त करण्याची मागणी

Chandur bajar जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात नागरिकांचा बळी जात असतानाच रोही, रानडुक्कर, हरणे, माकडे आदी वन्य प्राण्यांकडून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नागरिकांचे जीव आणि शेतकऱ्यांची शेती वाचविण्यासाठी वन विभागाने केवळ कागदी कारवाई न करता ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी आक्रमक मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी वनमंत्री, जिल्हाधिकारी तसेच अमरावतीच्या उपवनसंरक्षकांना पत्र देऊन वाघासह अन्य वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

वाघाला पकडणे, बेशुद्ध करणे, आवश्यक असल्यास कायद्यातील तरतुदींनुसार पुढील कार्यवाही करणे अथवा त्याला सुरक्षित अधिवासात स्थलांतरित करणे, अशी मागणी कडू यांनी केली आहे. तसेच वन्य प्राण्यांमुळे होणारे शेतपिकांचे नुकसान रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Ravikant Tupkar : आमदारांचे वेतन-भत्ते रोखा अन् शेतकऱ्यांना मदत करा

वाघाच्या बंदोबस्तासाठी आतापर्यंत करण्यात आलेली कार्यवाही, मृतांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी उचलण्यात आलेली पावले आणि वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेले आदेश यांची लेखी माहितीही कडू यांनी मागितली आहे.

भांबोरा येथील चरणदासराव इखे, सोनोरी येथील उर्मिला बाजीराव इवणे आणि शिरजगाव कसबा येथील दिनेश आवारे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यातील आणखी एका नागरिकाचाही वाघाच्या हल्ल्यात बळी गेल्याचा उल्लेख बच्चू कडू यांनी आपल्या पत्रात केला आहे.

दरम्यान, देऊरवाडा परिसरात वाघाचा वावर आढळून आल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांचे जीव, त्यांची शेती आणि नागरिकांची सुरक्षितता यापुढे दुर्लक्षित केली जाणार नाही. वन्यजीव-मानव संघर्षावर ठोस तोडगा निघेपर्यंत आक्रमक पाठपुरावा सुरूच राहील, असा इशारा कडू यांनी दिला आहे.

Akola Municipal Corporation : पाईपलाईन फुटली, रस्ता खचला; मनपाचा कारभार रामभरोसे!

वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त करणे आणि वाघाच्या हल्ल्यात कुटुंबातील सदस्य गमावणे, हे संबंधित कुटुंबासाठी आयुष्यभराचे दुःख आहे. अशा प्रत्येक कुटुंबासोबत मी ठामपणे उभा आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी माझा आक्रमक पाठपुरावा सुरूच राहील, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

वाघासह वन्य प्राण्यांचा ठोस व प्रभावी बंदोबस्त झाला नाही, तर वन विभागाच्या कार्यालयात ‘एक दिवसाचा गणपती’ बसवून तीव्र आंदोलन करण्यात येईल. गणपती विसर्जनाबाबतही आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल, असा स्पष्ट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

error: Content is protected !!