praja-foundation-mumbai-mla-report-card-2026-congress-top-shinde-mlas-bottom : वरुण सरदेसाई आघाडीवर, आदित्य ठाकरे १८व्या स्थानी; शिंदे गटाचे आमदार तळात
Mumbai : मुंबईतील आमदारांची विधानसभेतील कामगिरी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्याचे मूल्यमापन करणारा प्रजा फाउंडेशनचा ‘मुंबई आमदार प्रगती अहवाल २०२६’ जाहीर झाला आहे. या अहवालात मुंबईतील ३३ आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले असून, पहिल्या तीन क्रमांकांवर काँग्रेसच्या आमदारांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे पहिल्या पाचमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एकाही आमदाराला स्थान मिळालेले नाही. त्यामुळे मुंबईतील सत्ताधारी आमदारांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार काँग्रेसचे अमीन पटेल, अस्लम शेख आणि ज्योती गायकवाड यांनी अनुक्रमे पहिल्या तीन स्थानांवर स्थान मिळवले आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील प्रभू आणि मनोज जामसुतकर यांनी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान पटकावले आहे. त्यामुळे मुंबईतील आमदारांच्या कामगिरीत विरोधी बाकांवरील आमदारांचा वरचष्मा असल्याचे चित्र समोर आले आहे.
या अहवालातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई यांनी दहावे स्थान मिळवत आदित्य ठाकरे यांना मागे टाकले आहे. आदित्य ठाकरे यांचा क्रमांक १८वा आहे. त्यामुळे ठाकरे गटातील दोन्ही आमदारांच्या कामगिरीतही लक्षणीय फरक दिसून येत आहे.
मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा विचार करता भारतीय जनता पक्षाचे काही आमदार वरच्या क्रमांकावर असले तरी पहिल्या पाचमध्ये भाजपच्या एकाही आमदाराला स्थान मिळालेले नाही. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची कामगिरी तुलनेने पिछाडीवर असल्याचे अहवालातून स्पष्ट होते. शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे हे सर्वात शेवटच्या, म्हणजे ३३व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यासोबत अशोक पाटील आणि रामचंद्र कदम यांचाही खालच्या क्रमांकांमध्ये समावेश आहे.
Nagpur crime : मुख्यमंत्र्यांच्या शहरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार !
१. अमीन पटेल २. अस्लम शेख ३. ज्योती गायकवाड – काँग्रेस ४. सुनील प्रभू ५. मनोज जामसुतकर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ६. मनीषा चौधरी ७. योगेश सागर ८. अमित साटम ९. अतुल भातखळकर – भाजप१०. वरुण सरदेसाई ११. अनंत नर १२. अजय चौधरी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १३. पराग अळवणी – भाजप १४. हारुन शेख – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १५. मिहीर कोटेचा – भाजप १६. सना शेख – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १७. कॅप्टन आर. तमिळ सेल्वन – भाजप १८. आदित्य ठाकरे – शिवसेना १९. महेश सावंत – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २०. पराग शाह – भाजप २१. सुनील राऊत – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २२. मंगेश कुडाळकर – शिवसेना शिंदे गट २३. अबू आझमी – समाजवादी पक्ष २४. संजय पोतनीस – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्२५. संजय उपाध्याय – भाजप २६. मुरजी पटेल – शिवसेना शिंदे गट २७. विद्या ठाकूर – भाजप २८. तुकाराम काटे – शिवसेना शिंदे गट २९. कालिदास कोळंबकर – भाजप३०. दिलीप लांडे – शिवसेना शिंदे गट ३१. रामचंद्र कदम – भाजप ३२. अशोक पाटील – शिवसेना शिंदे गट ३३. प्रकाश सुर्वे – शिवसेना शिंदे गट
या क्रमवारीतून मुंबईतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांच्या कामगिरीतील फरक अधोरेखित झाला आहे. विशेषतः नागरिकांच्या प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडणे, प्रश्न विचारणे आणि लोकांच्या समस्या मांडण्याच्या बाबतीत विरोधी पक्षातील आमदार अधिक सक्रिय असल्याचे अहवालातील निष्कर्ष सूचित करतात.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांचा या अहवालातील क्रमवारीत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुंबईतील एकूण ३६ आमदारांपैकी ३३ आमदारांचेच प्रगतीपुस्तक प्रजा फाउंडेशनने जाहीर केले आहे.
आमदारांच्या कामगिरीबाबत प्रजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी सांगितले की, नागरिकांचे प्रश्न आमदारांच्या माध्यमातून विधानसभेत पोहोचतात का, हा त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना सर्वात मूलभूत मुद्दा आहे. पंधराव्या विधानसभेतील ३३ आमदारांच्या एकत्रित कामगिरीचे चित्र चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Drug Inspector Recruitment : एमपीएससी कडून ड्रग इन्स्पेक्टर भरती प्रक्रिया रद्द
प्रजा फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार, बाराव्या विधानसभेत आमदारांची सरासरी कामगिरी ६१ गुणांवर होती. चौदाव्या विधानसभेत ही सरासरी ५४ गुणांपर्यंत घसरली. पंधराव्या विधानसभेत त्यात किंचित सुधारणा होऊन सरासरी ५५ गुणांवर पोहोचली आहे. मात्र, या बदलाकडे केवळ गुणांची चढ-उतार म्हणून पाहता येणार नसून, त्यातून लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचे वास्तव प्रतिबिंबित होत असल्याचे प्रजा फाउंडेशनने स्पष्ट केले आहे.
एकूणच, प्रजा फाउंडेशनच्या २०२६ च्या अहवालाने मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचे राजकीय चित्र बदलून दाखवले आहे. काँग्रेसच्या आमदारांनी पहिल्या तीन क्रमांकांवर कब्जा केला असताना ठाकरे गटाच्या आमदारांनीही आघाडीच्या क्रमांकांमध्ये स्थान मिळवले आहे. त्याउलट सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे अनेक आमदार तळाच्या क्रमांकांवर असल्याने मुंबईच्या प्रश्नांवर सत्ताधारी आमदार किती सक्रिय आहेत, याबाबत नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे,







