Municipal Corporation Election : ‘नागरिक संवाद मंच’ची एन्ट्री, भाजपची डोकेदुखी वाढणार

BJP rebels unite to mount a challenge : भाजपमधील नाराजांनी वेगळी मोट बांधून उभे केले आव्हान

Akola महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार तयारीला लागले असतानाच, निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमधील नाराजांनी वेगळी मोट बांधत स्थापन केलेला ‘नागरिक संवाद मंच’ अकोल्याच्या राजकारणाला नवी दिशा देणार की भाजपसाठी डोकेदुखी ठरणार, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

शिस्तभंगाची कारवाई झालेल्या माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी आणि भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते डॉ. अशोक ओळंबे यांच्यासह पक्षातील नाराज आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ‘नागरिक संवाद मंच’ स्थापन केला आहे. या मंचाच्या बैठकीत महापालिकेत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करण्याचे संकेत देण्यात आले असून, त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर भाजपने शिस्तभंगाची कारवाई झालेल्या नेत्यांसह नाराज गटावर टीकेची झोड उठवली आहे.

Primary Health Centre : धक्कादायक! वसाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाळली औषधे

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर नाराज झालेले ज्येष्ठ नेते व तब्बल ३० वर्षे नगरसेवक राहिलेले हरीश अलीमचंदानी यांनी पक्षाला रामराम ठोकत निवडणूक लढवली होती. तसेच भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते डॉ. अशोक ओळंबे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून भाजपविरोधात निवडणूक लढवली. या दोन्ही बंडखोर उमेदवारांमुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले आणि त्याचा थेट फटका भाजपला बसला. अखेर भाजपला या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला.

या दोघांचे संबंधित प्रभागांतील वर्चस्व पाहता, सर्व नाराज नेते आणि कार्यकर्ते प्रत्यक्षात एकत्र आल्यास भाजपची डोकेदुखी निश्चितच वाढणार, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची घरवापसी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अकोल्यात हा पॅटर्न अपयशी ठरताना दिसत असून, उलट हा अपवादच पक्षासाठी अडचणीचा ठरत आहे.

Local Body Elections : देऊळगाव राजा नगरपालिकेत ‘अर्थकारण’ आघाडीवर!

 

नव्या राजकीय समीकरणासाठी नाराजांनी मंगळवारी सायंकाळी शहरातील बंधन लॉनवर ‘नागरिक संवाद’ आयोजित करत तिसऱ्या आघाडीची मोट बांधली. या वेळी हरीश अलीमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, माजी नगरसेवक गिरीश गोखले, आशिष पवित्रकार, हरिभाऊ काळे, चोटमल सारडा, पांडुरंग काळणे, विठ्ठलराव गाढे, मधुकर रगडे आणि प्रा. गणेश बोरकर आदी उपस्थित होते.

Mehkar Taluka : मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारीत संपणार

गेल्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या पराभवानंतर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत भाजपने अनेक आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. त्यानंतरच *‘नागरिक संवाद मंच’*ची स्थापना करण्यात आली. या मंचाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे भाजपला थेट आव्हान दिले जात असल्याचे चित्र आहे. कारण या नाराज गटाकडे हिंदुत्ववादी एकगठ्ठा मते असल्याने त्याचा फटका भाजपच्या उमेदवारांना बसू शकतो.

मागील विधानसभा निवडणुकीत झालेली चूक पुन्हा होऊ नये, या दृष्टीने भाजपचे वरिष्ठ नेते नाराज बंडोबांना शांत करण्यासाठी कोणते डावपेच आखतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.