व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Mehkar Taluka : मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारीत संपणार

Mehkar Taluka : मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारीत संपणार

Tenure of 41 village councils to expire in February : डोणगाव व वाघदेव ग्रामपंचायतींच्या कार्यकाळाबाबत संभ्रम

Mehkar मेहकर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींपैकी ४१ ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक कार्यकाळ येत्या फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. डिसेंबर २०२० मध्ये जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानंतर सरपंचपदाची पहिली सभा फेब्रुवारी २०२१ मध्ये झाल्याने आता अवघ्या दीड महिन्यांवर या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी होतील की त्यावर प्रशासक नियुक्त केला जाईल, याकडे उमेदवारांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून काही ठिकाणी कार्यक्रम जाहीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्याने इच्छुक उमेदवारांनी गेल्या सहा महिन्यांपासून झंजावाती दौरे सुरू केले आहेत.

Dog menace in court complex : न्यायालय आवारात श्वानांचा उपद्रव; पक्षकाराच्या मुलास चावा

मागील पंचवार्षिक काळात मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम डिसेंबर २०२० मध्ये जाहीर झाला होता. मतदान प्रक्रिया १५ जानेवारी २०२१ रोजी पार पडली, तर १७ जानेवारी २०२१ रोजी निकाल जाहीर झाला होता. फेब्रुवारी २०२१ च्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सरपंचपदाची पहिली सभा घेण्यात आली होती. यामध्ये ३९ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांची निवड झाली होती.

मात्र डोणगाव ग्रामपंचायतीचे प्रकरण न्यायालयात गेल्याने तसेच वाघदेव ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असतानाही गावात पात्र उमेदवार नसल्याने या दोन्ही ग्रामपंचायतींना सरपंच मिळू शकला नव्हता. डोणगाव ग्रामपंचायतीचा वाद गल्ली ते दिल्लीपर्यंत गेला असून तब्बल १६ महिन्यांनंतर तेथे सरपंचपदाची निवडणूक झाली होती. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतींची पहिली सभा वेळेत झाली नव्हती.

Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्र्यांच्या निलंबन सत्राविरुद्ध ‘महसूल’चा एल्गार!

साधारणतः सरपंचपदाच्या निवडीपासून ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ग्राह्य धरला जातो. अशा परिस्थितीत डोणगाव व वाघदेव ग्रामपंचायतींचा कार्यकाळ इतर ४१ ग्रामपंचायतींसोबतच संपणार की त्यांना वाढीव कार्यकाळ मिळणार, याबाबत सध्या संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त होण्याचीही चर्चा आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक विभागही हालचालींना वेग देत असून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार पुढील प्रक्रिया ठरणार आहे.

error: Content is protected !!