Municipal Corporation Elections : काँग्रेस–वंचित आघाडीची निव्वळ चर्चा, बंडखोरीचे सावट कायम

Congress–Vanchit tie-up only at discussion stage, rebellion threat looms : ८० जागांसाठी पक्षांची फिल्डिंग; उमेदवारीच्या प्रतीक्षेत कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला

Akola महानगरपालिकेच्या अंतिम मतदार यादीच्या प्रसिद्धीनंतर अकोला शहरातील निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. प्रभागनिहाय मतदारसंख्या स्पष्ट झाल्याने राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष मैदानात कंबर कसली असून, उमेदवारी व युतीबाबतच्या चर्चांना जोर आला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणूक लढवणार, अशी चर्चा सध्या माध्यमांपुरतीच मर्यादित असल्याचे चित्र आहे. अंतिम क्षणापर्यंत कोणती आघाडी अस्तित्वात येते, यावरच राजकीय समीकरणे ठरणार आहेत.

दुसरीकडे, महायुतीतही चित्र अद्याप अस्पष्ट आहे. भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात स्थानिक पातळीवर युती कशी आकार घेते, याबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे ‘युती की मैत्रीपूर्ण लढत?’ यावर सर्वच पक्षांनी सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Municipal Corporation Election : ‘नागरिक संवाद मंच’ची एन्ट्री, भाजपची डोकेदुखी वाढणार

महानगरपालिकेच्या ८० जागांसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. भाजपकडे सर्वाधिक तब्बल १,१२४ इच्छुक उमेदवार असल्याची माहिती आहे. मात्र, त्यापैकी केवळ ८० जणांनाच उमेदवारी मिळणार असल्याने उर्वरित इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. उमेदवारी न मिळाल्यास इतर पक्षांकडे किंवा अपक्ष लढण्याकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाहेरून येणाऱ्या ‘आयाराम’ नेत्यांना संधी मिळाल्यास, पाच वर्षे प्रभागात काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच कारणांमुळे महायुती व महाविकास आघाडी दोन्हीकडे बंडखोरीचे सावट गडद होत आहे.

Local Body Elections : देऊळगाव राजा नगरपालिकेत ‘अर्थकारण’ आघाडीवर!

भाजपने उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण करून सर्व ८० जागांसाठी संभाव्य उमेदवारांची यादी तयार ठेवली आहे. मात्र, युतीचे अंतिम चित्र स्पष्ट नसल्याने उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत आहे. अजित पवार गट युतीच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जागावाटपाचे गुऱ्हाळ अद्याप सुरू असल्याची चर्चा आहे.

प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे. एखादा प्रभाग मित्रपक्षाच्या वाट्याला गेल्यास, त्या ठिकाणी तयारी केलेल्या कार्यकर्त्यांची मेहनत वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे अनेक इच्छुक अपक्ष किंवा इतर पक्षांच्या वाटेवर जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. परिणामी, ही निवडणूक केवळ पक्षांची नव्हे, तर अनेक प्रस्थापित नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई ठरण्याची चिन्हे आहेत.

Primary Health Centre : धक्कादायक! वसाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाळली औषधे

शहरातील रस्त्यांची दुरवस्था हा प्रमुख मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. अनेक भागांत रस्त्यांची अजूनही वानवा असून, जे रस्ते झाले आहेत तेही अल्पावधीत खराब झाल्याचे चित्र आहे. काही प्रभागांत तर वर्षभरातच रस्ते नामशेष झाल्याच्या तक्रारी आहेत.
भाजप व शिंदेसेना मित्र पक्ष असले, तरी स्थानिक पातळीवर एकमेकांमध्येच तीव्र स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. मागील नगरपालिकेच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष आमनेसामने होते. त्यामुळे यंदा मनपात युती होते की नाही, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
अकोला शहराच्या विकासासाठी मंजूर निधी अद्याप प्राप्त न झाल्याने हा मुद्दा विरोधकांकडून आक्रमकपणे मांडला जात आहे. भूमिगत गटार योजना व रस्ते विकासाची संथ गती यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Sudhir Mungantiwar : बंगाली समाजाच्या विकासासाठी मुनगंटीवारांचे मोठे पाऊल!

मतदारसंख्येत लक्षणीय वाढ

२०१७ मधील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

मागील निवडणूक (२०१७) : ४,७७,३७२ मतदार
सध्याची मतदारसंख्या : ५,५०,१२८ मतदार

यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १२ टक्क्यांनी, तर महिला मतदारांची संख्या तब्बल १९ टक्क्यांनी वाढली आहे. एकूण मतदारसंख्येत १५ टक्के वाढ झाल्याने महिला मतदारांची भूमिका यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.