व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Nagpur Municipal corporation : १९२७ कोटींच्या ‘नाग नदी’ प्रकल्पातून ५ वर्षांत प्रदूषणमुक्तीचे...

Nagpur Municipal corporation : १९२७ कोटींच्या ‘नाग नदी’ प्रकल्पातून ५ वर्षांत प्रदूषणमुक्तीचे ध्येय

Target to make the Nag River pollution-free within five years through a ₹1,927 crore project : माहितीच्या अधिकारात उघड झाला प्रदूषण निर्मुलनाचा रोडमॅप

नागपूर: शहराची ओळख आणि जीवनवाहिनी असलेल्या नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी नागपूर महानगरपालिकेने आखलेल्या महाकाय प्रकल्पाचा सविस्तर तपशील आता समोर आला आहे. माहिती अधिकार अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते वेदप्रकाश आर्य यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महापालिकेने १९२६.९९ कोटी रुपयांच्या नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाचा संपूर्ण रोडमॅप उघड केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहराचे प्रदूषण रोखून नदीचे स्वरूप पूर्णपणे बदलण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आरटीआय मधून समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात दररोज सुमारे ५२० दशलक्ष लिटर (MLD) सांडपाणी निर्माण होते. धक्कादायक बाब म्हणजे, या सांडपाण्यातील मोठा हिस्सा सध्या कोणत्याही प्रक्रियेविना थेट नदी आणि नाल्यांमध्ये सोडला जात आहे. हे प्रदूषण मुळापासून नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने या विशेष प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या अवाढव्य प्रकल्पाचा खर्च केंद्र (६०%), राज्य (२५%) आणि महापालिका (१५%) असे एकत्रितपणे उचलत आहेत. या प्रकल्पाच्या देखरेखीसाठी ‘टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स’ यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Bacchu kadu : ट्रोलर्स ५० पैशात मिळतात, कुणाच्या बापाला घाबरत नाही; शिवसेनेत प्रवेश करताच बच्चू कडूंचा नागपुरातून कडाडून प्रहार

प्रकल्पाच्या तांत्रिक बाजूवर प्रकाश टाकताना महापालिकेने कळवले आहे की, शहरभर ५२० किलोमीटर लांबीची नवीन सीवर पाईपलाईन टाकली जाणार आहे. तसेच मोरभवन आणि आराधना कॉलनी यांसारख्या भागात नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले जातील. नदीला मिळणारे सर्व छोटे-मोठे नाले ‘इंटरसेप्टर’द्वारे जोडून, ते पाणी थेट प्रक्रिया केंद्रापर्यंत नेले जाईल. प्रकल्पाचा अधिकृत कालावधी ८ वर्षे असला, तरी महापालिका प्रशासनाने हा प्रकल्प ५ वर्षांत पूर्ण करण्याचा मानस ठेवला आहे.

 

Candidates assets : विधान परिषद उमेदवारांच्या संपत्तीची कोट्यवधींची उड्डाणे !

‘वॉटर टेस्ट रिपोर्ट’नुसार, काही ठिकाणी ऑक्सिजनची पातळी समाधानकारक आढळली असली, तरी सांडपाणी थेट नदीत मिळणे हे अजूनही मोठे आव्हान आहे. विशेष म्हणजे, गोसीखुर्द धरण आणि नदी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले की, त्यांच्याकडे यासंदर्भात सध्या कोणताही विशिष्ट सर्वेक्षण अहवाल उपलब्ध नाही. या प्रकल्पांतर्गत उत्तर आणि मध्य नागपूरची सीवर यंत्रणा सुधारण्यासोबतच मोक्षधाम येथे इलेक्ट्रिक शवदाह वाहिनीच्या निर्मितीचाही समावेश करण्यात आला असून पाच वेगवेगळ्या टप्प्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

error: Content is protected !!