व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bacchu kadu : ट्रोलर्स ५० पैशात मिळतात, कुणाच्या बापाला घाबरत नाही; शिवसेनेत...

Bacchu kadu : ट्रोलर्स ५० पैशात मिळतात, कुणाच्या बापाला घाबरत नाही; शिवसेनेत प्रवेश करताच बच्चू कडूंचा नागपुरातून कडाडून प्रहार

Trollers can be purchased in 50 paise, bacchu kadu alleges : समाज माध्यमांवरील प्रतिक्रियांना घाबरत नाही, विरोधकांना टोला

Nagpur प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी प्रहार संघटना दावणीला बांधली आणि आमदारकीसाठी संघटनेची तत्त्वे मोडीत काढली, असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज प्रथमच नागपूर विमानतळावर आले असता, बच्चू कडू यांनी टीकाकारांचा समाचार घेत त्यांना उघड आव्हान दिले. ट्रोल करणारे ५० पैशात मिळतात, मी अशांना घाबरणारा नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कडू म्हणाले की, समाजमाध्यमांवरील टीकेमुळे मी अजिबात विचलित झालेलो नाही. आजवर टीका कोणावर झाली नाही? प्रभू रामचंद्रांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्वांनाच टीकेचा आणि मनस्तापाचा सामना करावा लागला. मी तर त्यांच्यासमोर एक छोटासा कार्यकर्ता आहे. ट्रोल करणारे कोण आहेत हे मला चांगलेच ठाऊक असून मी कोणालाही घाबरणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

Candidates assets : विधान परिषद उमेदवारांच्या संपत्तीची कोट्यवधींची उड्डाणे !

आपल्या राजकीय निर्णयाचे समर्थन करताना त्यांनी इतर पक्षांमधील बदलांकडेही लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले, तेव्हा टीका झाली नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर कोणी बोलत नाही किंवा शिवसेना जेव्हा काँग्रेससोबत गेली, तेव्हाही अशी टीका झाली नाही. मग बच्चू कडूने निर्णय घेतल्यावरच काहींना पोटदुखी का होत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रहारच्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास असून राजकीय परिस्थितीनुसार हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Operation white strike : १,७४५ कोटींचे ३४९ किलो कोकेन जप्त, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट हादरले !

येणाऱ्या काळात शिवसेनेचा एक नवा चेहरा जनतेला बघायला मिळेल, असा दावा करत त्यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर आपली भूमिका ठाम असल्याचे सांगितले. पुढील सहा महिन्यांत जीवाचे रान करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू. शिवसेनेचे नव्याने धोरण तयार केले असून आता अधिक ताकदीने मैदानात उतरणार आहे. कितीही टीका झाली तरी शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी आणि दिव्यांगांची साथ सोडणार नाही, असा निर्धार बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात विदर्भातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!