Nagpur riots : वैध संपत्तीवर प्रशासनाचा अवैध हातोडा

Government pressure on municipal officials and police officers, alleges Nasir Khan : मनपा अधिकारी आमि पोलिस अधिकाऱ्यांवर सरकारचा दबाब, नासीर खान यांचा आरोप

Nagpur : मनपा अधिकारी असो किवा पोलिस अधिकारी यांच्यावर सरकारचा दबाब स्पष्ट होतो आहे. आता तर नागपूर खंडपीठाने या कारवाईला स्थगिती दिली आहे. मात्र, प्रशासनाने ज्यांना बेघर केले, त्यांची नुकसान भरपाई प्रशासकीय अधिका-यांकडूनच करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नासीर खान यांनी केली. वैध संपत्तीवर प्रशासनाचा अवैध हतोडा पडला असल्याचाही आरोप त्यांनी केला.

नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत नासीर खान म्हणाले, महानगरपालिका, पोलिस विभाग, नगर रचना विभागांनी बुलडोजर चालवून जे केले, त्यानंतर लोकांना कार्यपालिकेवर विश्‍वास राहीला नाही. त्यातही आधी फक्त अतिक्रमणित भाग तोडला जाईल, असे सांगून फहीम खानचे संपूर्ण घरच प्रशासनाने जमीनदोस्त केले. नागपूरात आमचा आपसी भाईचारा संपवण्याचे राजकारण सुरु असल्याची जहाल टिका त्यांनी केली. याशिवाय आरोपींचे घर चोवीस तासांची नोटीस देऊन पाडण्यात आले, जो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना आहे.

Nagpur riots : मुख्यमंत्र्यांनी घेतला यू-टर्न, नासीर खान यांचा आरोप

न्यायमूर्ती बी.आर.गवई व न्यायमूर्ती के.व्ही.विश्‍वनाथन यांनी १३ नोव्हेंबर २०२४ मध्ये उत्तरप्रदेश सरकारच्या बुलडोजर कार्यपद्धीला सर्वस्वी बेकायदा ठरवले होते. कार्यपालिकेने न्यायपालिकेवर वरचढ होऊ नये, असा इशारा दिला होता. बांधकाम वैध असेल किवा अवैध आरोपीला आधी १५ दिवसांची नोटीस देण्यात यावी. या अवधीमध्ये त्याला न्याय मागण्याची संधी असावी, त्यांच्या कुटूंबियांना बेघर करता कामा नये, असा सज्जड दम न्यायमूर्तींनी दिला असताना, नागपूरात सुटीच्या दिवशी आरोपींच्या कुटूंबियांना नोटीस देण्यात आली व सकाळी न्यायालयाच्या निर्णय येण्याआधीच वैध, अवैध घरे मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून पाडण्यात आल्याचे नासीर खान यांनी सांगितले.

Bacchu Kadu : उशाला धरण, तरी शेतकऱ्याच्या नशिबी मरण!

आमचा दंगेखोरांशी काहीही संबंध नाही. मात्र, नागपूरात जी दंगल घडली, ते एक षडयंत्रच होते, असा आरोप त्यांनी केला. फक्त सीसीटीव्ही फूटेज पाहून अनेक निरपराध तरुणांना पोलिसांनी बेकायदेशीर अटक केली. ज्यांचा या दंगलीशी कोणताही संबंध नव्हता, असा दावा त्यांनी केला. नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल हे खूप चांगले पोलिस अधिकारी आहेत. जे र्निदोष असतील त्यांना सोडून दिले जाईल, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिल्याचेही ते म्हणाले.