व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nana patole on RSS : अमेरिकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी संघटना घोषित...

Nana patole on RSS : अमेरिकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी संघटना घोषित केले आहे, नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

Nana Patole makes a sensational claim in Nagpur that the United States has declared the RSS a terrorist organisation : अयोध्येतील राम मंदिराच्या लुटीमध्येही सावंसेवकांचा सहभाग असल्याचा आरोप

Nagpur काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (आरएसएस) एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेने संघाला ‘आतंकवादी संघटना’ म्हणून घोषित केले असून, यामुळे जागतिक स्तरावर मोठा संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. याशिवाय, अयोध्येतील राम मंदिर निर्माण निधी आणि दान लूट प्रकरणातही संघाच्या स्वयंसेवकांचा सहभाग असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, येत्या काळात भाजप आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशाचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री यांच्यापासून ते भाजपचे बहुतांश वरिष्ठ नेते संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहेत. भाजपच्या निवडणुकीतील विजयात संघाचा आणि त्यांच्या स्वयंसेवकांचा सिंहाचा वाटा असतो. केंद्रीय मंत्री आणि आमदार नागपुरात आल्यानंतर संघ मुख्यालय भेट देतात, तसेच हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदारांसाठी खास वर्गही आयोजित केले जातात.

Sanjay Raut : धनुष्यबाण गोठवा अन् महाराष्ट्राच्या सहकारावरील ‘डल्ला’ थांबवा; संजय राऊतांचा अमित शाह, शिंदे आणि निवडणूक आयोगावर घणाघाती हल्ला

नुकतेच केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना संघ कार्यालयात जाण्यावर आणि संघकार्यात सहभागी होण्यावर असलेला दशकांचा बंदीचा नियम उठवला होता. अशा काळात अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेने संघाबाबत असा निर्णय घेतल्याचा दावा समोर आल्याने, सत्ताधारी भाजपची मोठी कोंडी झाली आहे. जागतिक पटलावर संघाची प्रतिमा डागाळल्याचा दावा करत विरोधकांनी आता सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे.

नाना पटोले यांनी केवळ परराष्ट्र धोरणापुरता हा विषय मर्यादित न ठेवता, अयोध्येतील राम मंदिराच्या दानामध्ये झालेल्या कथित घोटाळ्याशी संघाला थेट जोडले आहे. राममंदिरातील दान लूट प्रकरणात आरएसएसच्या स्वयंसेवकांचा सहभाग आहे, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. या आरोपामुळे धार्मिक आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधातील राजकीय पक्षांनी याआधीही संघाच्या भूमिकेवर आणि सिद्धांतांवर टीका केली आहे; मात्र आतंकवादी संघटना आणि ‘दान लूट’ यांसारख्या थेट आरोपांमुळे भाजप व संघ समर्थकांमध्ये संतापाची लाट आहे.

Bjp Ncp dispute : भाजप-राष्ट्रवादीतील संघर्ष चिघळला, नगरसेवकांचा विकासनिधी शून्यावर

भाजपच्या वतीने नाना पटोले यांच्या या दाव्यांचा तीव्र निषेध नोंदवत सडेतोड उत्तर दिले जाण्याची पूर्ण शक्यता आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा आरोप-प्रत्यारोपाचा वाद थांबण्याऐवजी आणखी चिघळणार हे नक्की.

error: Content is protected !!