Sanjay Raut launches a scathing attack on Amit Shah, Eknath Shinde and the Election Commission : चोरीचे चिन्ह वापरण्याचा अधिकार कुणालाही नाही; सहकाराच्या मुद्द्यावर फडणवीस-शिंदेंच्या मौनावरही राऊतांचा सवाल
Mumbai : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह चोरले गेले असून, चोरीचा मुद्देमाल जप्त करणे कायद्यानुसार आवश्यक आहे. त्यामुळे धनुष्यबाण तात्काळ गोठवण्यात यावा, अशी आक्रमक मागणी राऊत यांनी केली.
शिवसेना कुणाची आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह कुणाचे, याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण ठाकरे गटाला द्यावा किंवा ते चिन्ह गोठवण्यात यावे, असा युक्तिवाद न्यायालयात केला आहे. यावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाकडून ठाकरे गटावर ‘बाळासाहेबांचे विचार गोठवण्याचा प्रयत्न’ केल्याचा आरोप केला जात आहे.
या आरोपांचा खरपूस समाचार घेताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. “धनुष्यबाण चोरून एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार आहेत का? चोरीचे चिन्ह वापरण्याचा अधिकार कुणालाही नाही. धनुष्यबाणाचे पुढे काय करायचे, हे आम्ही ठरवू. त्यात कुणीही चोमडेपणा करण्याची गरज नाही,” असे राऊत म्हणाले.
Bjp Ncp dispute : भाजप-राष्ट्रवादीतील संघर्ष चिघळला, नगरसेवकांचा विकासनिधी शून्यावर
दरम्यान, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नागरी सहकारी बँकांबाबतच्या निर्णयावरही राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला. महाराष्ट्राची वैभवशाली सहकार चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असून, राज्यातील सहकारी बँकांवरील नियंत्रण आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
गुजरातमधील माधवपुरा बँकेचा संदर्भ देत राऊत यांनी महाराष्ट्रातील सहकारी बँकांच्या मालमत्ता आणि अधिकारांच्या केंद्रीकरणावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. हा महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रावर मारलेला मोठा डल्ला आहे, असा दावा त्यांनी केला.
Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेंचा आता दादा भुसेंवर थेट हल्लाबोल !
या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मराठीतून थेट पत्र पाठवल्याचेही राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या हितावर गदा येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हा विषय त्यांना समजला नाही की ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत? असा थेट प्रश्न राऊत यांनी विचारला.








