व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण NEET paper leak: विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकलेले असतानाच शरद पवार पंतप्रधान मोदींना भेटले!

NEET paper leak: विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकलेले असतानाच शरद पवार पंतप्रधान मोदींना भेटले!

Sharad Pawar meets PM Narendra Modi regarding NEET paper leak case: राजकीय वर्तुळात खळबळ, ‘इंडिया’ आघाडीत अस्वस्थता

New delhi नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतरवर युवकांचे आंदोलन प्रचंड भडकलेले असताना आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण इंडिया आघाडी रस्त्यावर उतरलेली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. संसद भवनात झालेल्या या हायव्होल्टेज भेटीत खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, कालच शरद पवार यांनी जंतरमंतरवर जाऊन आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके यांची भेट घेत विद्यार्थ्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला होता.

एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या संसदेवरील मार्चमध्ये स्वतः सहभागी झाले आहेत. संपूर्ण काँग्रेस पक्ष आंदोलनात उतरला आहे. विरोधकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सलग दोन दिवस संसदेचे कामकाज बंद पाडले असताना, पवारांच्या या अनपेक्षित चालीमुळे इंडिया आघाडीतील मित्रपक्षांना मोठा धक्का बसला असून सर्वांनाच सावध भूमिका घ्यावी लागत आहे.

NEET paper leak: NEET पेपर फुटीचा दिल्लीत भडका! विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार

दरम्यान, ही भेट राजकीय नसून प्रशासकीय स्वरूपाची असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत असले, तरी या भेटीचा अधिकृत खुलासा स्वतः शरद पवारच करतील असे स्पष्ट करण्यात आल्याने या भेटीच्या मुख्य अजेंड्याबाबत प्रचंड सस्पेन्स निर्माण झाला आहे. या घडामोडी घडत असतानाच महिला आरक्षण आणि मतदारसंघाच्या पुनर्रचना विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत.

Sunetra Pawar : ‘तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद होता…’आठवणींनी डोळे पाणावले”

 

सुप्रिया सुळे यांनी या विधेयकावर चर्चेची तयारी दर्शवत इंडिया आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली होती, तर दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी या विधेयकाला चर्चेची गरज नसून आमचा ठाम विरोध असल्याचे स्पष्ट केले होते. NEET घोटाळ्याच्या मुद्द्यावर ‘इंडिया’ आघाडी अधिक घट्ट आणि आक्रमक होत असतानाच, शरद पवारांनी थेट पंतप्रधानांची भेट घेतल्याने आणि पक्षांतर्गत वेगवेगळ्या भूमिका समोर आल्याने आता या भेटीमागे नक्की कोणते राजकीय गणित आहे, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!