New GST rate : केंद्र सरकारचा दिवाळी धमाका! टीव्ही, कपडे, खाद्यपदार्थ स्वस्त !

GST Council’s historic decision to abolish 12 and 28 percent slabs : जीएसटी कौन्सिलचा 12 व 28 टक्के स्लॅब रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय

New Delhi ; दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा जाहीर केला आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत 12 टक्के आणि 28 टक्के हे दोन्ही स्लॅब रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता देशात फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब लागू राहणार आहेत. सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

या निर्णयामुळे रोजच्या वापरातील वस्तू, कपडे, पादत्राणे, साबण, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचे दर लक्षणीयरीत्या कमी होणार आहेत. विशेष म्हणजे, आरोग्य विमा आणि जीवन विम्यावर संपूर्ण सूट देण्याची शक्यता व्यक्त केली जात असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Blast at solar company : नागपूरच्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट

नवी दिल्ली येथे झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनीच्या भाषणात जीएसटी सुधारणा होणार असल्याचे संकेत दिले होते, त्यानुसार आता हा निर्णय प्रत्यक्षात लागू होणार आहे.

नवीन कर रचनेनुसार आधी 28 टक्के जीएसटी असलेल्या वस्तूंवर आता 18 टक्के कर आकारला जाणार आहे. तर 12 टक्के जीएसटी असलेल्या वस्तूंवर कर कमी करून फक्त 5 टक्के करण्यात आला आहे. काही वस्तूंना थेट शून्य टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे.

५% जीएसटी असलेल्या महत्त्वाच्या वस्तू

इलेक्ट्रिक गाड्या, केसांचे तेल, शाम्पू, टूथपेस्ट, टूथब्रश
साबण, दाढीचे साबण, बटर, तूप, चीज, पॅक केलेले नमकीन, भुजिया, मिक्श्चर, बाळाची दुधाची बाटली, डायपर, नॅपकिन्स शिलाई मशीन व सुटे भाग, थर्मोमीटर, ग्लुकोमीटर व टेस्ट स्ट्रीप्स चष्मे व रोगनिदान उपकरणे ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे टायर्स व सुटे भाग, जलसिंचन व तुषारसिंचन उपकरणे, कृषी उपकरणे व फवारणी औषधे

Congress aggression : भाजपने मत चोरी करून 132 आमदार निवडून आणले !

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आगामी सणासुदीच्या काळात बाजारपेठेत खरेदीला मोठी चालना मिळणार असून सर्वसामान्य ग्राहकांना दिवाळीपूर्वीच आनंदाचा खरा “दिवाळी धमाका” अनुभवता येणार आहे.