व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Nitesh Rane : मुस्लिमांच्या कार्यक्रमात हिंदूंना परवानगी नसते मग गरब्यात मुस्लिमांना का?

Nitesh Rane : मुस्लिमांच्या कार्यक्रमात हिंदूंना परवानगी नसते मग गरब्यात मुस्लिमांना का?

nitesh-rane-garba-muslim-entry-question-mva-double-standard : नितेश राणेंचा थेट सवाल; महाविकास आघाडीवर दुटप्पीपणाचा आरोप

Mumbai : राज्यात सध्या डीजेच्या वापरावरून वाद सुरू असतानाच भाजप आमदार नितेश राणे यांनी गरबा उत्सवातील मुस्लिमांच्या प्रवेशाचा मुद्दा उपस्थित करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. गरबा उत्सवात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशी ठाम भूमिका राणे यांनी मांडली आहे.

मुस्लिमांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये किंवा हज यात्रेत हिंदूंना प्रवेश नसतो, मग गरबा उत्सवात मुस्लिमांना प्रवेश का द्यायचा, असा थेट सवाल त्यांनी केला आहे. मागील काही वर्षांपासून गरबा उत्सवात सहभागी होणाऱ्या मुस्लिमांना रोखण्याची मागणी नितेश राणे यांच्याकडून केली जात आहे. त्याच भूमिकेचा पुनरुच्चार करत त्यांनी हिंदू सणांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली.

Agriculture zone : पालकमंत्र्यांचा हुडकेश्वर – नरसाळा अजूनही ‘कृषी झोन’मध्येच

एकीकडे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणायचे आणि दुसरीकडे हिंदू सणांवर टीका करायची, अशी दुटप्पी भूमिका उद्धव ठाकरे घेत असल्याचा आरोप राणे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे हयात असताना अशा विषयांवर स्पष्टपणे भूमिका मांडत होते; मात्र उद्धव ठाकरे मुस्लिम सणांबाबत मूग गिळून बसतात, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, डीजेच्या वापराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची अधिकृत भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली असल्याचे नितेश राणे यांनी नमूद केले. त्यामुळे डीजेच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

Vedprakash arya : एनआयटी अधिकाऱ्यांचे भू-माफियांशी साटेलोटे !

नितेश राणे यांनी यापूर्वीही ईदच्या दिवशी सोसायट्यांमध्ये अथवा घरांसमोर केली जाणारी कुर्बानी याला तीव्र विरोध केला होता. दुसरीकडे, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी मुस्लिम समाजाला ऊर्स तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये डीजेचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. गरबा उत्सवातील प्रवेशाच्या मुद्द्यावर नितेश राणे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळासोबतच सामाजिक स्तरावरही नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!