व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Shivendraraje Bhosale : उगीच आम्हाला डिवचण्याचे काम करू नका, तुम्हाला परवडणार नाही...

Shivendraraje Bhosale : उगीच आम्हाला डिवचण्याचे काम करू नका, तुम्हाला परवडणार नाही !

shivendraraje-bhosle-warning-opponents-satara-political-conflict-shashikant-shinde : राजकीय संघर्ष पेटला, शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांना थेट इशारा

Mumbai : सातारा-जावळीच्या राजकारणातील जुना संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपचे नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना सूचक शब्दांत थेट इशारा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. जावळीतील दहीहंडी उत्सवादरम्यान बोलताना त्यांनी, “जंगलात फिरताना जंगल शांत आहे, याचा अर्थ जंगलात सिंह नाही, असे समजू नका,” असे वक्तव्य केले. त्यानंतर “उगीच आम्हाला डिवचण्याचे काम करू नका, तुम्हाला परवडणार नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या भाषणात कोणाचेही थेट नाव घेतले नसले, तरी त्यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सातारा-जावळी मतदारसंघातील दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाहायला मिळत आहे.

Manoj Jarange : मराठा आरक्षणावरून राजकीय रणकंदन! मनोज जरांगे यांचा शिंदे सेनेवर गंभीर आरोप

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे. निवडणुकीसाठी आवश्यक ठराव घेण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये राजकीय रस्सीखेच सुरू आहे. सहकारी संस्थांवरील वर्चस्व, स्थानिक राजकारण आणि आगामी निवडणुकांची समीकरणे यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातारा-जावळी भागातील भाजपचे प्रभावी नेते असून सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. दुसरीकडे शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय वर्चस्वावरून यापूर्वीही अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले आहेत.

Congress Protest : एमपीएससीच्या अनागोंदी कारभाराविरोधात काँग्रेस आक्रमक

दहीहंडीच्या व्यासपीठावरून शिवेंद्रसिंहराजेंनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी साताऱ्यातील राजकीय संघर्ष आणखी रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता त्यांच्या वक्तव्यावर शशिकांत शिंदे किंवा त्यांच्या गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!