Parashuram Corporation : परशुराम महामंडळाला गती; व्याज परतावा योजना जाहीर

Six senior chartered officers appointed to the board of directors : सहा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची संचालक मंडळावर नियुक्ती

Mumbai : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परशुराम महामंडळाला गती देत सरकारने सहा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची संचालक मंडळावर नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेमोरेंडम ऑफ असोसिएशन’ आणि ‘आर्टिकल्स ऑफ असोसिएशन’ ला मंजुरी दिल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली. या निर्णयासह बेरोजगार तरुणांसाठी व्याज परतावा योजना लागू करण्याचाही निर्णय घेण्यात आला असून, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

महामंडळाच्या संचालक मंडळावर नियुक्त झालेले अधिकारी असे आहेत, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उद्योग विभागाचे सचिव वी. अन्बलगन आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासो धुळाज.

Uddhav Balaseb Thackeray : केंद्र सरकारमुळे शेतकरी हवालदिल, उद्धव गटाचा हल्लाबोल

आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी महामंडळाने व्याज परतावा योजना लागू करण्याचे ठरवले आहे. याअंतर्गत व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याज परतावा, समूह गटकर्जासाठी ५० लाख रुपयांपर्यंत व्याज परतावा, शिक्षणासाठी १० लाख रुपयांचे कर्ज तसेच उच्च शिक्षणासाठी ‘सारथी’च्या धर्तीवर निवास आणि भोजनासाठी भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Ladki bahin Yojana : सरकारी लाडक्या बहिणींवर शिस्तभंगाची कारवाई !

दरम्यान, राज्यातील विविध समाजघटकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळांवरील नियुक्त्यांचा वाद अजून मिटलेला नसतानाच परशुराम महामंडळाला दिलेली गती ही सरकारकडून ब्राह्मण समाजाला दिलेली राजकीय भेट मानली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर या नियुक्त्यांद्वारे समाजात सकारात्मक संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

____