व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र PM Awas Yojna : ९८ हजार घरकुले अपूर्ण; ‘घरकुल’ स्वप्न अजूनही अधांतरी

PM Awas Yojna : ९८ हजार घरकुले अपूर्ण; ‘घरकुल’ स्वप्न अजूनही अधांतरी

98,000 houses incomplete; the housing for all dream still remains in limbo : हप्ता अडकला, बांधकाम ठप्प; गरीबांचा निवारा अजूनही हवेत

Buldhana हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांसाठी वास्तव मात्र अद्यापही कठोरच ठरत आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत मंजूर झालेल्या घरांपैकी तब्बल ९८ हजारांहून अधिक घरकुले अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. परिणामी अनेक लाभार्थी अर्धवट बांधकामात, तर काही जण तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये दिवस काढत आहेत.

घरकुलांच्या कामांना सर्वात मोठा फटका बसला तो हप्त्यांच्या विलंबामुळे. पहिला हप्ता मिळाल्यानंतर दुसरा आणि तिसरा हप्ता वेळेवर न मिळाल्याने अनेकांचे बांधकाम अर्ध्यावर थांबले आहे. त्यातच बांधकाम साहित्याच्या दरात झालेली मोठी वाढ आणि ऑनलाईन प्रक्रियेतील अडचणींमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

Devendra fadnavis : विरोधकांनी लोकशाही मारली, 70 कोटी महिलांचा विश्वासघात !

विशेषतः ‘स्पर्श’ प्रणालीमुळे अडचणी वाढल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ऑनलाईन नोंदी आणि मंजुरीसाठी लागू करण्यात आलेल्या या प्रणालीत फोटो अपलोड न होणे, सर्व्हर डाऊन होणे यांसारख्या तांत्रिक त्रुटींमुळे लाभार्थ्यांचे हप्ते रखडले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या वारंवार चकरा माराव्या लागत असून, “निधी आला नाही” किंवा “सिस्टममध्ये अडचण आहे” अशी उत्तरे मिळत आहेत.

दरम्यान, काही ठिकाणी हप्ता मिळवण्यासाठी लाच मागितली जात असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी मोताळा येथे कारवाई केल्याने या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली आहे.

Parth pawar : बारामती पोटनिवडणुक बिनविरोध व्हायला हवी होती, काहींनी मुद्दाम उमेदवार उभे केले

अनेक लाभार्थ्यांनी सिमेंट, विटा, वाळू यांसारखे साहित्य उधारीवर घेऊन घराचे बांधकाम सुरू केले; मात्र पुढील हप्ते न मिळाल्याने दुकानदारांकडून तगादा वाढला आहे. “उधारीवर किती दिवस काम चालणार?” असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यातच मागील दोन वर्षांत बांधकाम साहित्याच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे शासनाकडून मिळणारे अनुदान आणि प्रत्यक्ष खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.

Amravati Congress : काँग्रेसमध्ये बदलाचे वारे; जिल्हाध्यक्ष-शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची लगबग

उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२४-२५ (फेज-२) अंतर्गत जिल्ह्यात सुमारे १,०३,५०० घरकुलांना मान्यता देण्यात आली; मात्र त्यापैकी बहुतांश घरकुले अपूर्णच आहेत. पहिला हप्ता सुमारे ५५ हजार लाभार्थ्यांना मिळाला असला, तरी पुढील टप्प्यांमध्ये लाभार्थ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे.

error: Content is protected !!