Chandrapur’s development stopped; Pratibha Dhanorkar accused of a flop show : तब्बल २० कोटीचा विकास निधी पडून, खरा चेहरा आकडेवारीसह उघड
Chandrapur विकासाचा मोठा गाजावाजा करणाऱ्या आणि राजकीय दावे-प्रतिदावे करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा खरा चेहरा आता आकडेवारीसह जनतेसमोर आला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीच्या खर्चाचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, विकासकामांच्या बाबतीत त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचे उघड झाले आहे.
निधी मंजूर झाला, पण विकास कुठे? असा संतप्त सवाल आता चंद्रपूरकर विचारू लागले आहेत. अहवालातील आकडेवारीनुसार, खासदार धानोरकर यांना खासदार निधी अंतर्गत तब्बल १४.७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र, या प्रचंड निधीपैकी त्यांनी आतापर्यंत विकासावर केवळ ७८ लाख ३० हजार रुपये खर्च केले आहेत. म्हणजेच त्यांच्या एकूण निधी खर्चाचे प्रमाण अवघे ५.३ टक्के एवढेच आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अजूनही तब्बल १९ कोटी ९० लाख रुपये त्यांच्या खात्यात धुळखात पडून आहेत. चंद्रपूरसारख्या मोठ्या आणि विकासाची तीव्र गरज असलेल्या मतदारसंघात निधी पडून राहिल्याने खासदारांच्या इच्छाशक्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Legislative election : १० लाख घेतलेला एक तरी नगरसेवक दाखवा! पराभूत अतुल लोंढेंना भाजपचे खुले आव्हान
खासदारांच्या कार्यपद्धतीवर सर्वात मोठा प्रहार म्हणजे, त्यांनी आतापर्यंत ७० विकासकामांची शिफारस केली होती. पण या ७० कामांपैकी फक्त १ काम पूर्ण होऊ शकले आहे; उर्वरित ६९ कामे आजही अपूर्ण किंवा प्रशासकीय लालफितीत प्रलंबित आहेत. कामांच्या पूर्णत्वाचे हे प्रमाण केवळ १.४ टक्के इतके नगण्य आहे.
यात २०२४ मध्ये ४ कामांसाठी ३७ लाख, २०२५ मध्ये सर्वाधिक ५७ कामांसाठी सुमारे ७.५ कोटी रुपये, तर २०२६ मध्ये ९ कामांसाठी १.५ कोटी रुपयांची शिफारस करण्यात आली होती. या एवढ्या कामांपैकी केवळ घाटंजी तालुक्यातील अकोला बाजार ते सावळी मुख्य रस्ता जोडणाऱ्या ३५० मीटर रस्त्याचे काम (खर्च १९.७० लाख रुपये) डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण झाले आहे. या एका कामाव्यतिरिक्त चंद्रपूरच्या पदरात काहीही पडलेले नाही. अहवालात ५८.७० लाख रुपयांची देयके प्रक्रियेत असल्याचे म्हटले असले, तरी ७४.९ टक्के पेमेंट गॅप आहे. यामुळे प्रशासकीय स्तरावर आणि खासदारांमध्ये कोणताही ताळमेळ नसल्याचे स्पष्ट होत असून निधीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतील त्रुटी चव्हाट्यावर आल्या आहेत.
Sanjay Dina Patil vs Sanjay Raut :”तू काय आम्हाला तुडवणार?” संजय जाधवांचा संजय राऊतांना थेट इशारा
लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल मिळवून खासदार झालेल्या प्रतिभा धानोरकर यांचे हे प्रगतीपुस्तक समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. रस्ते, पिण्याचे पाणी, शैक्षणिक सुविधा आणि सार्वजनिक पायाभूत सोयींसाठी वापरता येणारा निधी असतानाही तो न वापरल्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. आगामी काळात या मुद्द्यावरून चंद्रपूरचे राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. फक्त घोषणाबाजी नको, तर प्रत्यक्ष काम हवे; लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तात्काळ समन्वय साधून हा निधी खर्च करावा आणि प्रलंबित ६९ कामे मार्गी लावावीत, अशी तीव्र भावना आता मतदारसंघातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे








