Raj – Fadnavis Visit : कदाचित ते गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी गेले असतील !

Sanjay Rauts harsh criticism from Uddhav Thackerays camp ; उद्धव ठाकरेंच्या खेम्यातून संजय राऊतांचा खोचक टोला

Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले. दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील नागरी समस्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याशी युतीची चर्चा सुरू असताना झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला आणि राज ठाकरेंना कोपरखळी मारली आहे.

संजय राऊत म्हणाले, “गणपती उत्सव तोंडावर आहे. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले असतील. राज्यासंदर्भात काही प्रश्न असतील. फडणवीसांच्या काळात मुंबई बुडाली. गेल्या दोन दिवसांत मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे अशी अनेक शहरं पाण्यात बुडाली आहेत. त्यामध्ये कुणाला इतका त्रास करून घेण्याची गरज नाही. आम्हाला काय चाललंय ते माहिती आहे.”

Parashuram Corporation : परशुराम महामंडळाला गती; व्याज परतावा योजना जाहीर

राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल विचारलं असता राऊत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही. उद्या माझं काही काम असेल, उद्धव ठाकरे यांचं काही काम असेल तर मुख्यमंत्री फडणवीसांना भेटू शकतो. मुख्यमंत्री हा एका गटाचा नसून संपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री असतो. या भेटीत काय चर्चा झाली हे राज ठाकरे स्वतःच सांगतील. ते परखड नेते आहेत.”

Mahayuti Government : जिल्हा पुरवठा कार्यालयात २३.५७ लाखांची अफरातफर!

यावेळी राऊतांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले. “५ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला की नाही, याचं उत्तर शिरसाट यांनी द्यावं. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून अवघ्या २५ दिवसांत ५,००० एकर वनजमीन बेकायदेशीरपणे सिडकोला दिली. हा भ्रष्टाचार सर्वांसमोर आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी मंत्र्यांना अटक करण्याचा जो कायदा आणण्याची तयारी केली आहे, त्याचा पहिला प्रयोग संजय शिरसाट यांच्यावर करावा,” असा टोला राऊतांनी लगावला.
राज ठाकरे, फडणवीस भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांचा माहौल तयार झाला असून, त्यात राऊतांच्या तिखट प्रतिक्रियेने अजून रंग भरला आहे.