Raj Thackeray : माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी पाहिली नाही !

70 candidates unopposed in Maharashtra; Raj Thackerays direct reaction : महाराष्ट्रात 70 उमेदवार बिनविरोध; राज ठाकरेंची थेट प्रतिक्रिया

Mumbai : महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदान होण्यास अवघे 12 दिवस शिल्लक असताना आणि निकाल जाहीर व्हायला 13 दिवस बाकी असतानाच राज्यभरात तब्बल 70 उमेदवार नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या बिनविरोध निवडींमध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले असून, या संपूर्ण घडामोडींवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पहिलीच थेट प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक मी कधीच पाहिली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अनेक निवडणुका पाहिल्या, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून येणारी निवडणूक मी पहिल्यांदाच पाहतोय. ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे, असं स्पष्ट मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

Solapur Crime: सोलापूरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसेच्या उमेदवाराचा मर्डर,

ठाण्याचे मनसे शहराध्यक्ष अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि माजी आमदार राजू पाटील यांनी आज शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान महापालिका निवडणुकांमधील बिनविरोध विजयांचा मुद्दा उपस्थित झाला असता राज ठाकरेंनी हे परखड वक्तव्य केलं.

दरम्यान, मुंबईसह राज्यातील विविध महापालिकांमध्ये झालेल्या बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन अर्ज मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याची सखोल तपासणी केली जाणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची अधिकृत विजय घोषणा केली जाणार नाही, अशी माहितीही निवडणूक आयोगाने दिली आहे.

नियमभंग सिद्ध झाल्यास संबंधित निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते. मात्र, उमेदवारांना पुन्हा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची कोणतीही तरतूद नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 2 जानेवारी, म्हणजेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर संबंधित अधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात येणार आहेत.

Rajya Sabha Election 2026: शरद पवारांसह महाराष्ट्रातील सात खासदार निवृत्त होणार

बिनविरोध निवडणुकांमध्ये भाजपाने आघाडी घेतली असून आतापर्यंत भाजपचे 44 उमेदवार नगरसेवकपदी बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक मिळवला असून त्यांच्या पक्षाचे 22 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे सर्वाधिक 15 उमेदवार, तर शिवसेनेचे 7 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार, मालेगावमधून इस्लाम पार्टीचा एक उमेदवार आणि एक अपक्ष उमेदवारही बिनविरोध निवडून आला आहे.

दरम्यान, राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. कोणत्या महापालिकेत कोणत्या पक्षाचे आणि कोणते उमेदवार बिनविरोध निवडून आले, याची सविस्तर यादीही समोर आली असून, या संपूर्ण प्रक्रियेवर आता राज्य निवडणूक आयोगासह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

___