व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Solapur Crime: सोलापूरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसेच्या उमेदवाराचा मर्डर,

Solapur Crime: सोलापूरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसेच्या उमेदवाराचा मर्डर,

Now they tell about family dispute; Praniti Shindes attack on BJP : आता सांगतील तो कौटुंबिक वाद; प्रणिती शिंदे यांचा भाजपवर घणाघात

Solapur : राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच सोलापुरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. मनसेचे पदाधिकारी आणि उमेदवार बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका व प्रभाग क्रमांक 2 च्या उमेदवारासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजपला सोलापुरात बिनविरोध निवडणुका हव्या होत्या आणि त्यासाठी उमेदवारांवर दबाव टाकण्यात आला. अर्ज माघार घेण्यासाठी भाजपकडून उमेदवारांना अक्षरशः फरपटत नेण्यात आले. काल जो खून झाला, त्यावर भाजपकडून तो कौटुंबिक वाद असल्याचं सांगितलं जाईल, मात्र हा थेट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी घडवून आणलेला मर्डर आहे, असा आरोप त्यांनी केला.

Rajya Sabha Election 2026: शरद पवारांसह महाराष्ट्रातील सात खासदार निवृत्त होणार

सोलापुरातील निवडणूक प्रक्रियेवरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. अद्यापही सोलापुरातील रिटर्निंग ऑफिसर उमेदवारांच्या अंतिम याद्या जाहीर करत नसल्याचा आरोप करत, शंभर टक्के भाजपने खिडकीतून एबी फॉर्म दिल्याचा दावा प्रणिती शिंदे यांनी केला. प्रशासनातील अधिकारी जर महाविकास आघाडी किंवा इतर पक्षांना न्याय देत नसतील, तर त्यांनी कुणाकडे बघायचं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासून यामागे नेमकं कोण आहे, हे उघड झालं पाहिजे असं सांगितलं. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धमक्या येत आहेत, बंडखोर उमेदवारांवरही दबाव टाकला जात आहे. पालकमंत्र्यांनी त्यांच्या पदाचा सन्मान ठेवायला हवा, मात्र इतक्या खालच्या पातळीवर जाऊन निवडणुका लढवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

BMC Elections : पैसा जिंकला, निष्ठा हरली म्हणणारे मनसेचे नेते किशोरी पेडणेकरांच्या प्रचारात

बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून खून झाला, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. भाजपकडे उमेदवार नाहीत, म्हणून ते महाविकास आघाडीतील उमेदवार फोडत आहेत. माघार घेण्याच्या दिवशी जे नाट्य घडलं, त्यातून भाजप पूर्णपणे एक्सपोज झाला आहे, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

एबी फॉर्म प्रकरणी भाजपविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देत त्यांनी सांगितलं की, महाविकास आघाडीचा सोलापुरातील प्रचार पाच तारखेला सुरू होणार आहे. काँग्रेस सोलापुरात ताकदीने लढत असून, नक्कीच महाविकास आघाडीचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप रक्तावर राजकारण करत असून, भाजपचे लोक फक्त पैशासाठी निवडणूक लढतात. खोके मिळतात म्हणून ते भाजपच्या तिकिटावर उभे राहतात, असा आरोपही त्यांनी केला. भाजपचे दोन ज्येष्ठ आमदार असूनही त्यांना पालकमंत्री किंवा मंत्रीपदापासून डावलण्यात येत असेल, तर ते दुर्दैवी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Rahul Narvekar : हास्यास्पद आरोप पराभव झाकण्यासाठीच केले जातात !

दरम्यान, या प्रकरणात सोलापुरात राजकीय वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्याचा आरोप आहे. या हत्येप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार शालन शिंदे, त्यांचे पती शंकर शिंदे यांच्यासह एकूण 15 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल उमेदवारी अर्ज माघार घेण्यावरून भाजप उमेदवार शालन शिंदे आणि भाजपच्या बंडखोर उमेदवार रेखा सरवदे यांच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाला होता.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांनी मयत बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात चटणी टाकली, तर इतर आरोपींनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. मयत बाळासाहेब यांचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे यांच्या तक्रारीवरून कलम 103, 109, 189 (1)(2), 190, 191 (2)(3), 49, 352, 351(2), शस्त्र अधिनियम 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेमुळे सोलापुरातील महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील राजकीय घडामोडींवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.

___

error: Content is protected !!