व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Salil deshmukh: सलील देशमुख यांच्याकडे राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या नागपूर जिल्हा ग्रामीण...

Salil deshmukh: सलील देशमुख यांच्याकडे राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदाची धुरा

Salil deshmukh appointed as nagpur district president of Sharad Pawar NCP : पदवीधर मतदारसंघाच्या समन्वयकपदाचीही दुहेरी जबाबदारी

Nagpur राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेतृत्व आणि विदर्भातील धडाडीचे नेते सलील देशमुख यांची नागपूर जिल्हा ग्रामीण पक्षाच्या अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. जयंत पाटील यांच्या हस्ते सलील देशमुख यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे नागपूर जिल्ह्यातील पक्षसंघटनेला एक नवीन संजीवनी आणि तरुण ऊर्जा मिळणार असून, पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर सलील देशमुख यांनी मुंबईत पक्षप्रमुख खा. शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यासोबतच त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रियाताई सुळे, आ. जयंत पाटील आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.

Ayodhya donation theft : अयोध्या राम मंदिरातील चोरीने रामभक्तांच्या श्रद्धेला मोठा धक्का; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीव्र प्रतिक्रिया

सलील देशमुख यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये विदर्भ प्रमुख म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या याच संघटनात्मक कौशल्याचा आणि आक्रमक कार्यपद्धतीचा फायदा आता नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याला मिळणार आहे.

विशेष म्हणजे, सलील देशमुख यांनी नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले असल्यामुळे त्यांना जिल्ह्यातील भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची ‘खडानखडा’ माहिती असून ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न आणि स्थानिक प्रशासकीय गणिते यावर त्यांची मजबूत पकड आहे. त्यांनी नेहमीच कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम केले असून, अनिल देशमुख अडचणीत असताना खचून न जाता त्यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे खेचून आणली आणि पक्षसंघटनेकडेही विशेष लक्ष दिले.

Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर 3’ची पुन्हा चर्चा; ठाकरे – पवार गटातील लोकप्रतिनिधी गळाला !

सलील देशमुख यांचा दांडगा लोकसंपर्क, प्रशासकीय कामांचा अनुभव आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या खांद्यावर अत्यंत महत्त्वाची दुहेरी जबाबदारी सोपवली आहे. नागपूर जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदासोबतच त्यांची ‘नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या समन्वयक’ पदी देखील नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सलील देशमुख यांच्या नियुक्तीची बातमी समजताच नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!