The theft at the Ayodhya Ram Temple has dealt a major blow to the faith of Lord Ram devotees; RSS reacts strongly : अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत होसबळे यांनी व्यक्त केली चिंता
Nagpur अयोध्या येथील श्री रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेले भव्य मंदिर हे पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष आणि कोट्यवधी रामभक्तांचे समर्पण, त्याग व बलिदानाचे प्रतीक असून ते संपूर्ण हिंदू समाजाचे श्रद्धास्थान आहे. अशा परम पवित्र अयोध्या मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीला जाण्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, यामुळे संपूर्ण समाज आणि रामभक्तांच्या भावना व श्रद्धेला मोठा आघात पोहोचला आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण संघ परिवारला धक्का बसला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक शुक्रवारी कर्नाटक मधील बेळगाव येथे सुरू झाली आहे. त्यापूर्वी होसबळे यांनी आपली प्रतिक्रिया सार्वजनिक केली. या बैठकीतही या घटनेवर चिंता व्यक्त करण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सर्व सह-सरकार्यवाह, अखिल भारतीय कार्य विभाग प्रमुख, कार्यकारिणी सदस्य आणि देशातील सर्व ४६ प्रांतांचे प्रांत प्रचारक व विविध संघटनांचे संघटक उपस्थित आहेत.
Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर 3’ची पुन्हा चर्चा; ठाकरे – पवार गटातील लोकप्रतिनिधी गळाला !
या बैठकीत मार्च २०२६ नंतर संघाच्या विविध स्तरांवर संपन्न झालेल्या प्रशिक्षण वर्गांचा वृत्तांत आणि शाखांच्या स्तरावरील कार्ययोजनांच्या अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. तसेच संघ शताब्दीनिमित्त झालेल्या शाखा विस्तार कार्याचा आढावा घेऊन आगामी काळातील जास्तीत जास्त शाखा विस्ताराची योजना आखली जाईल. याशिवाय शताब्दी वर्षात संपन्न झालेल्या कार्यक्रमांची समीक्षा, उर्वरित नियोजित कार्यक्रमांची रूपरेषा आणि पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या वर्ष २०२६-२७ च्या प्रवास योजनेवरही या बैठकीत मंथन केले जाणार आहे. संघाचे हे शताब्दी वर्ष (२०२५-२६) असून याचे उर्वरित सर्व कार्यक्रम आगामी विजयादशमी म्हणजेच २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत चालणार असल्याची माहिती संघातर्फे देण्यात आली आहे.








