व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांची एका ताईवर टीका, दुसरीला शुभेच्छा!

Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांची एका ताईवर टीका, दुसरीला शुभेच्छा!

MLA sanjay gaikwad wishes ex-mla rekha khedekar on her birthday : म्हणाले, पुन्हा सक्रीय नेतृत्व करा; माजी आमदाराच्या वाढदिवसाची अशीची चर्चा

Buldhana आमदार संजय गायकवाड यांनी माजी आमदार रेखा खेडेकर यांना वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांमध्ये वापरलेल्या विशेषणांमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. केवळ औपचारिक शुभेच्छांपुरता हा विषय मर्यादित न राहता, त्यामागे एखादा सूचक राजकीय संदेश दडलेला आहे का, याची चर्चा आता रंगू लागली आहे.

विशेष म्हणजे, एका ‘ताई’वर टीकेची धार कायम ठेवत दुसऱ्या ‘ताई’चा जाहीर गौरव केल्याने या शुभेच्छांकडे केवळ सामाजिक शिष्टाचार म्हणून पाहिले जात नाही. उलट त्यातून भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी असल्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. गायकवाड यांनी रेखाताईंच्या कार्यशैलीतील सुसंस्कृतपणा, समंजसपणा, संयम आणि संवादकौशल्य यांचा उल्लेख करत त्यांचे नेतृत्व अधोरेखित केले. त्यामुळे त्यांच्या शब्दांना अधिक राजकीय वजन प्राप्त झाले आहे.

Mehkar municipal council : मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून मेहकर पालिकेत राजकीय वाद; विरोधकांचा सभेवर बहिष्कार

सध्याच्या राजकारणात वैयक्तिक टीका, सूडबुद्धी आणि बदल्याच्या राजकारणाचा प्रभाव वाढत असल्याची भावना अनेकांकडून व्यक्त होत असताना, रेखाताईंनी आपल्या कार्यकाळात समतोल आणि संवादप्रधान राजकारण जपल्याचा उल्लेखही चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या याच कार्यपद्धतीच्या जोरावर त्यांनी सलग हॅट्रीक साधली होती, ही बाब कार्यकर्ते आणि समर्थकांकडून पुन्हा अधोरेखित केली जात आहे.

दरम्यान, रेखाताईंनी पुन्हा सक्रिय नेतृत्व करावे, अशी मागणीही काही कार्यकर्त्यांकडून पुढे येऊ लागल्याने या शुभेच्छांमागील राजकीय अर्थ अधिक गडद होत आहे. आगामी स्थानिक किंवा विधानसभा राजकारणाच्या पार्श्वभूमीवर नवीन आघाड्या, नव्या समन्वयाच्या शक्यता किंवा विशिष्ट गटबांधणीची चाचपणी सुरू असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Maharashtra RTO : रिक्षा परमिटची राज्यभर फेरतपासणी; मराठी न आल्यास परवाना रद्द!

या सर्व घडामोडींमुळे बुलढाण्याच्या राजकीय पटावर ‘ताई फॅक्टर’ पुन्हा प्रभावी ठरणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आमदार गायकवाड यांच्या शुभेच्छा केवळ औपचारिक होत्या की मोठ्या राजकीय खेळीची नांदी, याचे उत्तर येत्या काळातील हालचालींवर अवलंबून राहणार आहे.

error: Content is protected !!