Sanjay Gaikwad : बुलढाणा नगरपरिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता

Shivsena secures absolute majority in the Buldhana Municipal Council : पूजा संजय गायकवाड नगराध्यक्षपदी; ३० पैकी २२ विजयी

Buldhana बुलढाणा नगरपरिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड यांची निवड झाली असून नगरपरिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे. नगरपरिषदेत एकूण 30 सदस्य असून त्यापैकी शिवसेनेचे तब्बल 22 सदस्य निवडून आले आहेत. भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शप गट) आणि आघाडीचे प्रत्येकी दोन सदस्य निवडून आले आहेत.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पूजा संजय गायकवाड यांनी 18 हजार 525 मते मिळवत विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक 1 अ मधून प्रशांत उत्तम जाधव यांनी 1 हजार 428 मते मिळवून सदस्यपदावर विजय मिळवला असून प्रभाग क्रमांक 1 ब मधून सपना अमित मावतवाल यांनी 1 हजार 397 मते घेत यश संपादन केले आहे. प्रभाग क्रमांक 2 अ मधून निसार खान इसाक खान यांनी 781 मते, तर 2 ब मधून परवीन मोहम्मद अजहर यांनी 1 हजार 48 मते मिळवत विजय मिळवला आहे.

Sanjay Rathor : शिंदे गटाच्या बैठकीत तणाव, खुर्च्या उगारल्या

प्रभाग क्रमांक 3 अ मधून तमिजा बी युनुस खान यांनी 857 मते तर 3 ब मधून अनिल गणेश वर्मा यांनी 842 मते मिळवून विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 4 अ मधून जाकीर हुसैन शेख कादर कुरशी यांनी 1 हजार 609 मते, तर 4 ब मधून मुबशशेरा आयेशा अताउल्लाह खान यांनी 1 हजार 558 मते मिळवत यश मिळवले आहे. प्रभाग क्रमांक 5 अ मधून सविताताई प्यारेलाल हडाले यांनी 1 हजार 430 मते, तर 5 ब मधून गजेंदग शालीग्राम दांदडे यांनी 1 हजार 708 मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे.

प्रभाग क्रमांक 6 अ मधून वैशाली राहुल सुरडकर यांनी 1 हजार 419 मते तर 6 ब मधून मृत्युंजय संजय गायकवाड यांनी 1 हजार 437 मते मिळवत विजय संपादन केला आहे. प्रभाग क्रमांक 7 अ मधून सरला सुनील बरडे यांनी 1 हजार 810 मते तर 7 ब मधून सतीश रामभाऊ बरडे यांनी 1 हजार 510 मते मिळवून विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 8 अ मधून वैशाली रामेश्वर वावरे यांनी 1 हजार 238 मते तर 8 ब मधून सचिन विलास गायकवाड यांनी 1 हजार 783 मते मिळवत यश संपादन केले आहे.

Local Body Elections : खामगाव नगरपरिषदेत भाजपाची ऐतिहासिक घोडदौड

प्रभाग क्रमांक 9 अ मधून अशोक तुकाराम इंगळे यांनी 1 हजार 109 मते तर 9 ब मधून देविता योगेश परसे यांनी 1 हजार 190 मते मिळवून विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 10 अ मधून इंदुबाई शामराव घट्टे यांनी 1 हजार 303 मते तर 10 ब मधून विजय मधुकर जायभाये यांनी 1 हजार 222 मते मिळवत सदस्यपद पटकावले आहे. प्रभाग क्रमांक 11 अ मधून नयनप्रकाश सुखदेव शर्मा यांनी 761 मते तर 11 ब मधून निलम देवेंद्र खोत यांनी 805 मते मिळवून विजय संपादन केला आहे.

प्रभाग क्रमांक 12 अ मधून आकाश विजय दळवी यांनी 979 मते तर 12 ब मधून देवांगना अमित ठाकरे यांनी 993 मते मिळवून यश मिळवले आहे. प्रभाग क्रमांक 13 अ मधून राखी विनोद बेंडवाल यांनी 1 हजार 43 मते तर 13 ब मधून विनोद रमेश बेंडवाल यांनी 1 हजार 154 मते मिळवत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 14 अ मधून मालती आश्रूबा शेवाळे यांनी 1 हजार 300 मते तर 14 ब मधून सोहम पुरुषोत्तम झाल्टे यांनी 927 मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक 15 अ मधून पुष्पा शिवाजी धुड यांनी 1 हजार 294 मते तर 15 ब मधून दिपक दशरथ सोनुने यांनी 1 हजार 120 मते मिळवत विजय संपादन केला आहे.