व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Local Body Elections : खामगाव नगरपरिषदेत भाजपाची ऐतिहासिक घोडदौड

Local Body Elections : खामगाव नगरपरिषदेत भाजपाची ऐतिहासिक घोडदौड

BJP’s historic surge in the Khamgaon Municipal Council : नगराध्यक्षांसह २९ जागांवर कमळ; ना. आकाश फुंडकरांचे निर्विवाद वर्चस्व

Khamgao खामगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने एकतर्फी व दणदणीत विजय मिळवित शहरावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदासह तब्बल २८ जागांवर भाजप तर १ जागेवर भाजप समर्थित अपक्ष उमेदवार विजयी झाला असून, एकूण २९ जागांवर कमळ फुलले आहे. या निकालामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांचा जवळपास सफाया झाला आहे.

निकाल जाहीर होताच खामगाव शहरात भाजप कार्यकर्त्यांनी डिजेचा दणदणाट, गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीने उशिरा रात्रीपर्यंत जल्लोष साजरा केला. ही निवडणूक ना. आकाश फुंडकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती आणि निकालाने त्यांचे नेतृत्व अधिक बळकट झाले आहे.

Lavasa scam : लवासा गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

१७ प्रभाग, ३५ जागा; भाजपाची सुरुवातीपासूनच आघाडी

खामगाव नगरपरिषदेतील १७ प्रभागांमधील ३५ जागांसाठी तसेच जनतेतून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांनी स्वबळावर, तर काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उमेदवार माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली मैदानात होते. मात्र प्रत्यक्ष लढत भाजप विरुद्ध उर्वरित पक्ष अशीच राहिली.

नगराध्यक्षपदी सौ. अपर्णाताई फुंडकरांचा दणदणीत विजय

भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. अपर्णाताई सागर फुंडकर यांनी २५,५५४ मते मिळवत काँग्रेस महाविकास आघाडीच्या सौ. स्मिताताई किशोर भोसले (१४,८८५ मते), राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या सौ. चेतना संजय शर्मा (८,६३४ मते) यांचा पराभव केला. त्या १०,७६९ मतांच्या फरकाने विजयी झाल्या.

Manikrao Kokate : ‘त्या’ प्रकरणात माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला प्रभाग क्र. २-अ, १३-अ व १७-अ अशा ३ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) ला प्रभाग क्र. ७-अ व १२-अ अशा २ जागा, तर प्रभाग क्र. २-ब मधून भाजप समर्थित अपक्ष उमेदवार विजयी झाला. उर्वरित सर्व जागांवर भाजपाने वर्चस्व राखत खामगाव नगरपरिषदेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदविला.

स्थानिक तहसील कार्यालयाजवळील महात्मा गांधी सभागृहात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच भाजप उमेदवारांची आघाडी स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. विजयी उमेदवारांना वाजत-गाजत प्रभागात नेण्यात आले. संपूर्ण शहरात विजयाचा उत्साह ओसंडून वाहत होता.

error: Content is protected !!