Sanjay Raut : राज्यातील काही मंत्र्यांना वगळण्याचा अमित शहांचा सल्ला !

Petition filed against Thackeray is a medal, claims Sanjay Raut : ठाकरेंवर दाखल याचिका हे तर ‘मेडल’, संजय राऊत यांचा दावा

Mumbai : राज्यातील सुमारे चार मंत्र्यांना वगळण्याचा सल्ला अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. अशी माझी खात्रीशीर माहिती आहे. यां मंत्र्यांमध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे पण नाव आहे. असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज ठाकरेंवर दाखल झालेल्या याचिकेवर बोलताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा हवाला देत सांगितले की, ठाकरेंसाठी याचिका, कोर्ट नवीन नाही. जनहितासाठी होणाऱ्या केसेस या आमच्यासाठी ‘मेडल्स’ आहेत.

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांना वगळण्याची सूचना अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव आहे. आपल्याकडे यासंदर्भात माहिती आहे. शेतकऱ्यांना भेटायला कृषीमंत्र्यांना वेळ नाही. पण ‘ऑनलाइन गेम’ खेळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. छत्तीसगडमध्ये ऑनलाईन गेमिंगबाबत अनेक राजकीय नेत्यांवर कारवाई झाली. परंतु आपल्याकडील नेत्यांवर ही कारवाई होत नाही, हा सरकारचा दुप्पटीपणा आहे, असे खासदार राऊत यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray : भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवा, समाजातील भेदाभेद नष्ट कर !

राऊत म्हणाले, राज्यात 650 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर ही शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कृषीमंत्री जात नाही. त्यांच्याकडे वेळ नाही. आशा आमदारांना कृषीमंत्री पद दिले आहे. राज्यात कोणाकडे पैशाचे बॅग मिळतात, कोणी विधानभवन परिसरात मारामारी करतो, या पद्धतीने राज्याचे कारभार सुरु आहे. अशी टीका राऊत यांनी केली. राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्यावर बोलताना त्यांनी म्हटले की, ठाकरे यांना याचिका, कोर्ट हे विषय नवीन नाही. या याचिका कशासाठी आहेत, महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडल्याबद्दल या याचिका दाखल झाल्या आहेत.

Mahayuti Government : अजित पवार गटाचा भाजपला धक्का, मोठा नेता राष्ट्रवादीत!

शिवसेनाप्रमुख म्हणत होते, या पद्धतीच्या याचिका हे आमचे. न ‘ मेडल’ आहेत. हे पदक आमच्याकडे असले पाहिजे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. त्यात ट्रम्प यांच्या विधानावरुन केंद्र सरकारला घेरनार असल्याचे राऊत यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत – पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यासाठी आपण मध्यस्थी केली, हा दावा केला आहे. त्यावर आम्ही प्रश्न विचारणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही सापडले नाही. त्यामुळे अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत, असे ते म्हणाले.